Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह; २० गुंठे जमीन देण्याचे आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आमदार शंकर जगताप यांनी किमान २० गुंठे जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 08:12 PM
सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह

सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वसतिगृह

Follow Us
Follow Us:

निगडी/पुणे : सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवड परिसरात वसतिगृह उभारण्यासाठी सोलापूर जिल्हा मित्र मंडळाला किमान २० गुंठे जमीन उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार शंकर जगताप यांनी दिले. या जमिनीच्या उपलब्धतेसाठी आमदार सुनील कांबळे आणि विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनीही सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सोलापूर जिल्हा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचा नागरी सत्कार सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने निगडी येथील सीझन्स बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आला. यानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा स्नेहमेळावाही आयोजित करण्यात आला होता.

या वेळी सोलापूर जिल्हा मित्र मंडळाचे संयोजक अॅड.अतुल पाटील यांनी प्रस्तावना करताना उपस्थित लोकप्रतिनिधींकडे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी पिंपरी-चिंचवड परिसरात किमान २० गुंठे जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर उद्योजक दिनेश मोरे व अजय करंडे यांनी वसतिगृहाच्या बांधकामासाठी सर्व आर्थिक सहाय्य करणार असल्याचे जाहीर केले.

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

आमदार शंकर जगताप यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच या मागणीची दखल घेत, वसतिगृहासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘जमीन मिळवण्यासाठी व वसतिगृहाच्या बांधकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष निधी मिळविला जाईल तसेच यापुढील काळात सोलापूर जिल्ह्यातून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आलेल्या विद्यार्थी, उद्योजक आणि नोकरदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचा हा उपक्रम मार्गी लावण्यासाठी सामुहिक प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी सोलापूर जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात वास्तव्यास असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाळासाहेब बावकर, प्रशांत घोडके, सुमित जगदाळे, अमोल गव्हाणे, किरण मोरे यांनी सहकार्य केले.

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

Web Title: Solapur students hostel pimpri chinchwad shankar jagtap land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap
  • Pimpri Chinchwad
  • Solapur
  • Student

संबंधित बातम्या

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
1

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
3

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
4

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.