Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘डिजिटल अरेस्ट’ करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा; मुंबई पोलीस आणि ईडी अधिकारी असल्याचा बनाव

Cyber ​​Fraud News: सायबर भामट्यांनी एका गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. तुमच्यावर मनी लॉन्ड्रंग, अवैध जाहिरात तसेच छळवणूक प्रकरणी केस असून तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात असे दाखवले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 26, 2025 | 03:17 PM
'डिजिटल अरेस्ट' करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा (Photo Credit - AI)

'डिजिटल अरेस्ट' करून गृहिणीला २५ लाखांचा गंडा (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मनी लॉनड्रिंग, अवैध जाहिरात
  • छळवणूक गुन्ह्याची बतावणी
  • डिजिटल अरेस्ट; २६ लाखांना गंडा
Cyber ​​Fraud Chhatrapati Sambhajinagar: मुंबई क्राईम ब्रँच व सक्तवसुली संचालनालय (ईडी) चे अधिकारी असल्याचा बनाव करून सायबर भामट्यांनी एका गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. तुमच्यावर मनी लॉन्ड्रंग, अवैध जाहिरात तसेच छळवणूक प्रकरणी केस असून तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात, अशी भीती दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले. हा प्रकार १६ ते २२ डिसेंबर दरम्यान गारखेडा परिसरातील बगाडीया नगर, सह्याद्री हिल्स येथे घडला.

भीती दाखवून घातला ‘डिजिटल’ वेढा

सह्याद्री हिल्स येथे राहणाऱ्या गृहिणीने फिर्याद दिली. त्यानुसार, १६ डिसेंबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून त्यांना फोन आला. मोबाइल सेवा बंद होणार असल्याचे तसेच त्यांच्या नावावर बेकायदेशीर जाहिरात व छळवणुकीचे प्रकरणी कसे झाली असल्याची बतावणी करुन कॉल मुंबई क्राईम बँच अधिकाऱ्यांकडे वळवण्यात आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला क्राईम बँच अधिकारी असल्याचे सांगत व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केला. प्रोफाइलवर मुंबई पोलिसांचा लोगो असल्याने फिर्यादी घाबरल्या.

हे देखील वाचा: Waluj MIDC Fraud Case: वाळूज एमआयडीसीत मोठी फसवणूक! पाईप सप्लायरला ९१ लाखांचा गंडा; पुण्यातील उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा दाखल

आरोपींनी त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेले बनावट बँक खाते व एटीएम कार्ड दाखवत मनी लॉडिंगचा खोटा आरोप लावला. सायबर गुन्हेगारांनी ईडी कार्यालयाच्या बनावट नोटिसा, अटक वॉरंट तसेच एका आरोपीचे छायाचित्र पाठवले. तुमच्या विरोधात एफआयआर आहे, तपास सुरू आहे, असे सांगून कोणालाही माहिती दिल्यास कुटुंबाला धोका असल्याची धमकी देण्यात आली, यामळे फिर्यादी खुप घाबरल्या.

डिजिटल अरेस्टमध्ये असल्याचे भासवले

तपासाच्या नावाखाली फिर्यादीला सतत व्हिडीओ कॉलवर ठेवण्यात आले. तुम्ही सव्हिलन्सवर आहात, असे सांगत फोन चार्जिंगला लावून कॉल सुरू ठेवण्यास भाग पाडण्यात आले. कोणाशीही संपर्क साधू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली. तसेच याबाबत कोणाला काही सांगू नका अन्यथा तुमच्या घरी धाड टाकून फायरिंग करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.

टप्याटप्प्याने उकळले पैसे

१७ ते २२ डिसेंबरदरम्यान तपासासाठी पैशांची पडताळणी आवश्यक असल्याचे सांगून गुगल पे, यूपीआय, आणि आरटीजीएसद्वारे विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडले. तसेच एफडी मुदतपूर्व तोडून सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या खात्यावर पैसे पाठवायला लावून एकूण २५ लाख ८७हजार रुपयांची फसवणूक केली.

हे देखील वाचा: Khopoli Crime : शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ

Web Title: In chhatrapati sambhajinagar a housewife was defrauded of 25 lakhs through a digital arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Cyber Fraud

संबंधित बातम्या

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
1

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
2

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
3

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
4

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.