Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीत पोलीस स्टेशन समोरच फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं काय घडलं?

सांगलीत तीन दिवसांपूर्वी सत्यविजय चौकात किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 14, 2025 | 04:26 PM
सांगलीत पोलीस स्टेशन समोरच फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं काय घडलं?

सांगलीत पोलीस स्टेशन समोरच फ्री स्टाईल हाणामारी, नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : सांगलीत तीन दिवसांपूर्वी सत्यविजय चौकात किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला आहे. शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारी हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. हाणामारीचा व्हिडीओ सर्वत्र ‘व्हायरल’ झाला आहे. सांगली शहर पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संशयित शोएब रफीक गोलंदाज, जैद अब्दुल मुनाफ, सद्दाम सलीम मोमीन (रा. खणभाग, सांगली) व आयान नौशाद सुतार, नौशाद नबीलाल सुतार, इक्बाल सिकंदर तांबोळी, रफिक रसून शेख (चौघे रा. सावळवाडी, ता. मिरज) या दोन्ही गटातील सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

संशयित शोएब गोलंदाज याचा भाऊ हुजेफ गाेलंदाज व त्याचा मित्र कलिम खान हे दिनांक १० रोजी सत्यविजय चौकात थांबले होते. त्यावेळी सावळवाडी येथील युसूफ शेख तेथे आला. हुजेफ याने त्याच्याकडे पाहिल्यानंतर, माझ्याकडे का पाहतोस म्हणून युसूफने बाजूला पडलेली फरशी उचलून हुजेफच्या डोक्यात मारली. याबाबत हुजेफने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याच्या चौकशीच्या निमित्ताने दोन्ही गटांचे लोक पोलिस ठाणे परिसरात आले होते. तेव्हा तीन दिवसांपूर्वीच्या वादातून दोघे जण एकमेकाला भिडले. त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. तेव्हा इतरांनी तत्काळ धाव घेत त्यांना आवरले. परंतु यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटातील तरुणांना शांत केले. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरूद्ध मारामारी, झोंबाझोंबी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा : शिरवळमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

दगडाने ठेचून मुलाचा खून

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.

Web Title: In front of the sanglit police station a free style fight has taken place between two groups nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • sangli news
  • sangli police

संबंधित बातम्या

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
2

Maharashtra Rain Update: 19 ऑगस्टलाही सावधान…, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
4

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.