Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: आई-मुलीच्या नात्याला काळिमा; स्वत:च्याच मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो काढले अन्…

मुंबईतील मीरा रोडच्या नयानगर परीसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामूळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका महिलेच्या कृत्यामुळे आई-मुलीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असुन अधिक माहिती समोर येत आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 25, 2026 | 11:12 AM
MumbaiCrime News

MumbaiCrime News

Follow Us
Follow Us:
  • आई मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना
  • मुली गाढ झोपेत असताना  मोबाईल मध्ये रेक़़ॉर्ड केले फोटो, व्हिडीओ
  • मुंबईमधील नयानगरमध्ये खळबळ
Mumbai Crime: मुंबईतील नयानगर परिसरातून आई-मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दोन अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते प्रियकराला पाठवल्याचा आरोप ४२ वर्षीय महिलेवर आहे. या प्रकरणी नयानगर पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या ४६ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गेल्या काही काळापासून पतीपासून वेगळी राहत होती. ती नयानगर परिसरात आपल्या २२ वर्षीय मुलासह तसेच १३ आणि १० वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसोबत राहत होती. मार्च महिन्यात दोन्ही मुली गाढ झोपेत असताना महिलेने त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवले.

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती मिळाली. संबंधित महिलेने केवळ आपल्या मुलींचेच व्हिडिओ रेकॉर्ड केले नाहीत, तर आरोपी प्रियकरासोबतचे तसेच अन्य काही व्यक्तींचेही व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ते एकमेकांना शेअर केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईलमधील व्हिडिओ तसेच ते कोणाला आणि कशा पद्धतीने पाठवण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे नयानगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींचे संरक्षण आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: In mumbai captured objectionable videos and photos of shes own daughter on mobile phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
1

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
2

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार
4

पुण्यानंतर आता मुंबईतही पेटकेअर प्रशिक्षण संस्था? मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.