Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 20, 2025 | 12:43 PM
पुण्यात डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

पुण्यात डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

Follow Us
Follow Us:

पुणे : पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत पोपट बाबुराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुलदिप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीत ७ जानेवारी रोजी घडली होती. पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुलदिपचे लग्न झाले होते. तरीही त्याने जीवनसाथी डॉट कॉम साईटवर नोंदणी करून आपण अविवाहित असल्याचे भासविले. दरम्यान, तो व तक्रारदार यांच्यात लग्नाबाबत बोलण्याची सुरूवात झाली. तो तक्रारदारांना देहु येथे समक्ष जाऊन भेटला. पण, त्याचे वागणे व आरोपीचा दवाखाना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदिपला नकार कळविला. असे असताना तक्रारदारांच्या परस्पर मुलगी पल्लवीशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. पल्लवी बीएमएसएच झाली होती. तिचे तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक आहे. कुलदिपने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. नंतर तिने लग्नाचा विषय काढल्यावर आपले लग्न झाले असून आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. याचा तिला मोठा मानसिक धक्का बसला.

हे सुद्धा वाचा : पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे, सातारा कनेक्शनही उघड

तिने त्याच्याकडे १० लाख रुपये परत मागितले. परंतु, तो टाळाटाळ करु लागला. तेव्हा तिने चिठ्ठी लिहून आपल्या क्लिनिकमध्ये विषारी औषध घेतले. ही बाब समजल्यावर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत पोपट फडतरे यांनी सांगितले की, कुलदिप सावंतने आपल्या मुलीची फसवणूक केली. तिच्यापासून आपले लग्न झाल्याचे लपवून ठेवले. तिच्या मृत्यूला कुलदिप जबाबदार आहे. ती रुग्णालयात उपचार करताना तो तिला पहायला आला होता. आम्ही गडबडीत असल्याने त्यावेळी काही करु शकलो नाही. आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शशांक जाधव करीत आहेत.

Web Title: In pune a female doctor committed suicide in the clinic itself nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Sucide News

संबंधित बातम्या

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?
1

येवलेवाडीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, मारहाणीनंतर धमकी; नेमकं काय घडलं?

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
2

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
3

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
4

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.