Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ; ‘या’ क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन, 613 गुन्हे…

Cyber Crime News: कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2025 | 07:01 PM
Cyber Crime: सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ; ‘या’ क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन, 613 गुन्हे…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, केंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावी, असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे. नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते.

सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींग, सोसायटी मिटींग, जेष्ठ नागरिकांचे क्लब, झोपडपट्ट्या तसेच शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धती, सुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत, असे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

सायबर चोरट्यांकडून तरुणाची फसवणूक; तब्बल लाखोंना घातला गंडा

राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी आहे असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Increase percentage of cyber crime in maharashtra police appeal to contact 1930 helpline contact number marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Maharashtra Police
  • police

संबंधित बातम्या

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन,  तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर
1

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर

Badlapur News: बदलापूरमधील पोलिसाचाच मेल हॅक; ऑनलाईन फसवणुकीत तब्बल 13 लाखांचा गंडा, लाखांचं लोनही काढलं
2

Badlapur News: बदलापूरमधील पोलिसाचाच मेल हॅक; ऑनलाईन फसवणुकीत तब्बल 13 लाखांचा गंडा, लाखांचं लोनही काढलं

Pune Crime:  कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण; नंतर इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये…
3

Pune Crime: कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण; नंतर इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये…

Chandrapur News: NEET 99.99% टॉपर, MBBS प्रवेशापूर्वीच १९ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
4

Chandrapur News: NEET 99.99% टॉपर, MBBS प्रवेशापूर्वीच १९ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.