Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

Wedding Scandal : नऊ लग्न करुन पैशांची केली लुट, दहावं लग्न करायला महाराष्ट्रात आली अन् पोलिसांनीच केला भांडाफोड. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्यासोबत आणखी कुणाचा समावेश यात आहे का याचा तपास केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 03:30 PM
‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून वधू फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून वधू फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या नावाखाली सुरू असलेल्या एका धक्कादायक फसवणूक प्रकरणाने अनेकांना हादरवले आहे.
  • तरुणांना विश्वासात घेऊन मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप संबंधित महिलेवर करण्यात आला आहे.
  • पोलिस तपासात या प्रकरणामागे आणखी काही लोकांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोटाळे हे अनेक प्रकारचे तुम्ही ऐकले असतील पण लग्नाच्या स्कॅमविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? इंदूरची २० वर्षीय सलोनी सोलंकी अशाच एका स्कॅम चालवत होती ज्यात तिने लग्नाच्या आमीषाने तब्बल ९ तरुणांची फसवणूक केली. आपल्या दहाव्या लग्नासाठी ती बुलढाणा येथे आली असता पोलिसांनी तिला अटक केली आणि तिची खरी ओळख उघड झाली.

Keral Crime: नवरा-बायकोच्या वादात मुलाने बापालाच मारलं; डोक्यात खुर्ची घालून हत्या

सलोनी ही राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील घाटोल येथे भुवनेश जैन याच्याशी विवाह करुन राहत होती. परंतु हे लग्न देखील पोलिस तपासात फसवणूकच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या तपासात हे उघड झाले की, सलोनीने आतापर्यंत एकूण नऊ वेळा लग्न केले होते. प्रत्येक वेळी ती वधू बनून लोकांची आर्थिक फसवणूक करत होती.

पीडित भुवनेश जैनने सांगितले की, सलोनीसोबतचे त्याचे लग्न सरीता जैन नावाच्या दलालाच्या माध्यमातून ठरले होते. लग्नाआधी सलोनीने ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लग्नाचा करार करून घेतला आणि ३.७० लाख रुपये रोख घेतले. यानंतर दोघांचे लग्न पार पडले. सलोनी १५ दिवस भुवनेशच्या घरी नवरी बनून राहिली आणि नंतर वडिलांच्या प्रकृतीचे कारण देत तिने भुवनेशकडून आणखी ८७ हजार रुपयांची मागणी केली. त्याने हे पैसे तिला दिला ज्यानंतर ती इंदूरला निघून गेली.

घरातून गेली ती परत आलीच नाही

सलोनी घरातून गेली ती परत आलीच नाही. तिने भुवनेशसोबत संपर्क ठेवला पण प्रत्येकवेळी ती टाळाटाळ करु लागली ज्यामुळे त्याला तिच्यावर संशय येऊ लागला. या संशयावरुन त्याने सलोनीची माहिती काढू पाहिली ज्यात त्याला धक्कादायक खुलासे मिळाले. समोर आले की, बांसवाडा येथे तिसऱ्यांदा लग्न करण्यापूर्वी सलोनीने इंदूर आणि इतर ठिकाणी आधीच दोनदा लग्न केले होते. यानंतर, तिने एका महिन्यात आणखी सहा पुरुषांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली.

दहावं लग्न करणार होती

१ ऑगस्ट रोजी सलोनी दहाव्या लग्नासाठी महाराष्ट्रातील बुलढाण्यात दाखल झाली होती पण स्थानिक पोलिसांना आधीच माहिती मिळाल्यामुळे त्यांनी लग्नाआधीच सलोनीला आपल्या ताब्यात घेतले. याचवेळी तिच्यासोबत लग्न करु पाहणाऱ्या तरुणालाही तिचे खरे रुप समजले ज्यानंतर तो हादरुन गेला. पिडित भुवनेशने सलोनीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत पोलिसांना निवेदन सादर केले आहे. यात त्याने सांगितले की, लग्नापूर्वी सलोनीला महागडे कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि अंदाजे चार लाख रुपयांची रोकड देण्यात आली होती, जी तिने सोबत नेली.

Nandurbar Crime: नदीकाठी सुरू होता हातभट्टीचा अड्डा; पोलिसांनी टाकली धाड आणि १.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिस आता लग्न करण्यासाठी सलोनीने हाताशी घेतलेल्या दलालवरही नजर ठेवून आहेत. या संपूर्ण प्रकरणात दलाल सरिता जैन यांची भूमिकाही संशयास्पद मानली जात आहे. भुवनेशचा आरोप आहे की, दलाल सरिताला सलोनीच्या काळ्या प्रकारांची माहिती आधीच होती तरीही तिने त्याचे तिच्याशी लग्न लावून दिले. याच पार्श्वभूमीवर पोलिस आता सरिताची चाैकशी करत आहे. यात सलोनीला आणखी कुणाची साथ होती का याचाही पोलिस तपास करत आहेत.

 

Web Title: Indore looteri bride arrested in buldhana before tenth marriage after cheating grooms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Police
  • Wedding

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.