Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: वाढदिवसाच्या दिनीच IT अभियंता तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; नेमके घडले काय?

प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेंट मिक्सर आणि ट्रक यांसारख्या अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक चालक नियम धुडकावत आहेत. त्यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 21, 2025 | 09:23 PM
Pune Crime: वाढदिवसाच्या दिनीच IT अभियंता तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; नेमके घडले काय?
Follow Us
Follow Us:

पुणे: Pune Accident News:   शहर प्रतिनिधी. बाणेर भागात एका भरधाव डंपरच्या पाठिमागील चाकाखाली सापडून एका आयटी अभियंता तरुणीचा मृत्यू झाला. तर, तिची सहप्रवासी मैत्रिण गंभीर जखमी झाली. अपघातानंतर डंपरचालकाने पळ काढला. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली. तेजल प्रकाश तायडे (२७, रा. तलासरी, ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (१९ जून) मध्यरात्री घडला. याच दिवशी तेजलचा वाढदिवस होता. तर, प्राची जगन्नाथ पाचंगे (२८, रा. डांगे चौक, थेरगाव) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तेजल आयटी अभियंता होती. ठाण्यातील एका कंपनीत काम करत होती. १६ जूनपासून कामानिमित्ताने पुण्यात आली होती. गुरुवारी तिचा वाढदिवस होता. त्यामुळे मैत्रीणीसोबत ती बालेवाडी हायस्ट्रीट परिसरात जेवण्यास गेली होती. जेवणानंतर केक घेऊन दोघी घराकडे निघाल्या. त्यावेळी गणेश मंदिर चौकात भरधाव वेगात डंपर जात होता. त्यावेळी हा अपघात झाला. यात तेजल गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राची पाचंगे हिच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी डंपरचालक राहुल भीमराव राठोड (२४, रा. भोंडवे वस्ती, रावेत) याला रात्री अटक केली.

महिनाभरात १४ जणांचा मृत्यू

मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत एका विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील जड वाहतूकीचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेंट मिक्सर आणि ट्रक यांसारख्या अवजड वाहनांना बंदी असतानाही अनेक चालक नियम धुडकावत आहेत. त्यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात शहरात विविध ठिकाणी १४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

तरुणीचा दुचाकीवरील तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या डंपरचे मागील चाक तेजलच्या अंगावरून गेले. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. चालकाला अटक करून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

– चंद्रशेखर सावंत (वरिष्ठ निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे)

HIT AND RUN: 19 वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनीने उडवली स्कुटी, अपघातात महिलेचा मृत्यू

पनवेलमध्ये भीषण अपघात

पोर्शे कार अपघात सगळ्यांना स्मरणात असेलच. काही महिन्यापूर्वी एका श्रीमंतांच्या पोराने दोन बाईकस्वारांना चिरडून ठार मारलं होत. आता नवी मुंबईच्या न्यू पनवेलमध्ये असाच एक प्रकार समोर येत आहे. एका धनिकपुत्रीने मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. कार चालक १९ वर्षीय मुलगी असून तीच नाव तिथी सिंग असे आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री 8.45 वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे.

Web Title: It engineer girl accidental death baner pune police crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • Accident Death
  • crime news
  • Pune Accident

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.