पोर्शे कार अपघात सगळ्यांना स्मरणात असेलच. काही महिन्यापूर्वी एका श्रीमंतांच्या पोराने दोन बाईकस्वारांना चिरडून ठार मारलं होत. आता नवी मुंबईच्या न्यू पनवेलमध्ये असाच एक प्रकार समोर येत आहे. एका धनिकपुत्रीने मर्सिडीज कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या दोघांना उडवले आहे. कार चालक १९ वर्षीय मुलगी असून तीच नाव तिथी सिंग असे आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नवीन पनवेल येथील हिरानंदानी पुलावर बुधवारी रात्री 8.45 वाजता हा अपघात घडला. खारघर पोलिसांनी याप्रकरणी भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ कार चालवणाऱ्या मुलीला अटक केली आहे.
रक्षकच ठरला भक्षक? १० लाखासाठी पोलिसानेच केला पत्नीचा छळ, चौघांविरोधात गुन्हा दाखल
बुधवारी रात्री पती-पत्नी स्कुटरवरून घरी परत येत होते. त्यावेळी शीव-पनवेल महामार्गावरील खारघर परिसरात असणाऱ्या हिरानंदनी पुलावरून त्यांची स्कुटर खाली उतरत होती. त्यावेळी सिंग ही तिच्या मर्सिडीज कारने भरधाव वेगात येत होती. तिच्या मर्सिडीज बेंझ कारने पाठीमागून यादव दाम्पत्याच्या स्कुटरला धडक दिली. मर्सिडीज कार वेगात असल्याने दोघेही दाम्पत्य हवेत फेकले गेले आणि जोरात खाली आपटले. यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पतीच्या पायाला, हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतर वाहन चालकांनी जखमी पती पत्नीला बाहेर काढून गंभीर जखमी अवस्थेत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केले.
अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव रेखा यादव (वय 50) असे आहे. तर त्यांचे पती गोपाल यादव (वय 54) हे गंभीरीत्या जखमी झाले आहेत. गोपाल आणि रेखा यादव हे पनवेलमधील देवद भागात वास्तव्याला आहेत. रेखा यादव या घाटकोपरच्या पंतनगर येथील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथी सिंग ही बेलापूरवरुन आपल्या मित्रांना भेटून परत येत होती. त्यावेळी हा अपघात घडला. पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. तसेच पोलिसांकडून मर्सिडीज कार चालवणाऱ्या 19 वर्षीय तिथी सिंग हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
देवगडमध्ये भीषण अपघात, रिक्षा आणि एसटीची धडक; चार जणांचा जागीच मृत्यू