Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच! तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी

पुण्यासारख्या शांत व शैक्षणिक शहरात दहशतवाद्यांचे जाळे आता नवनव्या भागांत पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2025 | 12:48 PM
दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच! तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी

दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच! तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी

Follow Us
Close
Follow Us:
  • दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ पुण्यातच
  • भोसरी, खडकी आणि वानवडी परिसर संशयाच्या भोवऱ्यात
  • तपास यंत्रणांच्या कारवाईत उघड झाली धक्कादायक साखळी
पुणे/अक्षय फाटक : पुण्यासारख्या शांत व शैक्षणिक शहरात दहशतवाद्यांचे जाळे आता नवनव्या भागांत पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोंढव्यानंतर आता खडकी, भोसरी आणि वानवडी हे भाग ‘संशयित हालचालींचे केंद्र’ म्हणून तपास यंत्रणांच्या रडारवर आले असल्याचे गेल्या काही वर्षात समोर आले आहे. अलीकडच्या काळात एटीएस, एनआयए आणि स्थानिक पोलिसांच्या छाप्यात मिळालेल्या माहितीतून ही चिंताजनक बाब उघड झाली आहे. गुन्हेगारीसोबतच दहशतवाद्यांचे ‘सेफ झोन’ देखील पुण्यातच आहे ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. बुधवारी एटीएसने संशयित हालचाली तसेच २०२३ मधील धागेधोऱ्यांवरून मध्यरात्री या भागांमध्ये एकाचवेळी सर्च ऑपरेशन राबविले आहे.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी पुण्यातील कोंढवा, वानवडी, खडकी तसेच पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत एकाच वेळी छापेमारी केली. संशयित हालचालींच्या माहितीवरून तसेच यापुर्वी आयसीस या दहशतवादी संघटनेच्या अटक केलेल्या सदस्यांच्या माहितीवरून ही छापेमारी केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुणे गेल्या काही वर्षात दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे स्पष्ट आहे. पण, आता दहशतवाद्यांचा ‘आसरा’ देखील पुणे होत असल्याचे वास्तव दिसून आले आहे.

पुण्यात कोंढव्यात सर्वाधिक कारवाया देशविघातकृत्यांच्या अनुषंगाने झाल्याचे दिसून येत आहे. पण, त्यानंतर कोंढवा यासोबतच खडकी, वानवडी तसेच भोसरी परिसर देखील तपास यंत्रणांच्या रडावर आलेला आहे. संशयित हालचालींवर सातत्याने येथे तपास यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन राबविले जात आहे. गुप्तचर विभाग, एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अलीकडेच काही ठिकाणी संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यात आली. त्यात काही परप्रांतीय आणि विदेशी नागरिकांनी योग्य कागदपत्रांशिवाय पुण्यात वास्तव्य केल्याचे उघड झाले आहे.

बनावट कागदपत्रे तयार करुन वास्तव्य

पुण्यातून पुर्ण भारतात जाण्यासाठी सहजता उपलब्धता आहे. पुण्यात राहून इतर शहरात व राज्यात जाऊ शकतो. पुण्यातून सर्व सुविधा व उपलब्धता हे देखील एक कारण पुण्यात रहिवास करण्याचे असल्याचे सांगतिले जाते. कोंढवा, खडकी, वानवडी व भोसरी परिसरात भाड्याने या व्यक्ती राहत असल्याचे आतापर्यंत झालेल्या कारवाईने समोर आले आहे. बनावट कागदपत्रे तयार करून ते येथे वास्तव्य करतात. दाटीवाटीचा परिसर व प्रचंड गर्दी आणि वाहने देखील येथे जाऊ शकत नाहीत. तसेच एका खोलीतच राहून हे संशयित त्यांचे कामे करतात.

गुप्तचर यंत्रणांचे कान टवकारले

खडकी आणि वानवडी हे लष्करी संवेदनशील पट्टे असल्याने या भागात आढळलेल्या हालचालींनी गुप्तचर यंत्रणांचे कान टवकारले आहेत. काही ठिकाणी लहानमोठ्या झोपडपट्ट्यांत बाहेरून आलेल्या व्यक्तींनी तात्पुरते वास्तव्य केल्याचेही पोलिसांना आढळले आहे. त्यानुसार सर्व रेंटल रजिस्ट्रेशन, आधार पडताळणी आणि स्थानिक पोलीस व्हेरिफिकेशन यंत्रणा पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. “पुण्यातील काही भाग ‘सुरक्षित ठिकाण’ म्हणून निवडले जात आहेत. येथील उच्चशिक्षित वर्ग, तंत्रज्ञान क्षेत्र, सामाजिक विविधता यामुळे लक्ष वेधले जात नाही. त्यामुळे काही कट्टरवादी गट हेच वैशिष्ट्य दहशतवादी नेटवर्कसाठी ‘कव्हर’ म्हणून वापरत आहेत.

पूर्वघटना : पुण्यातील दहशतवादी हालचालींचा मागोवा

वर्ष  ठिकाण      घटना / कारवाई तपास संस्था   
२०१९ कोंढवा आयएसआयएस सेल उघड
महाराष्ट्र एटीएस
९ संशयित अटक
२०२२ खडकी लष्करी क्षेत्रात संशयास्पद ड्रोन आणि परदेशी नागरिक चौकशी खडकी पोलिस, लष्करी गुप्तचर
२०२३ भोसरी संशयास्पद आर्थिक व्यवहार; परदेशी खात्यांशी लिंक आर्थिक गुप्तचर विभाग
२०२४ पिंपरी–भोसरी कट्टर विचारसरणीचा प्रसार करणारे सोशल नेटवर्क गट उघड पिंपरी-चिंचवड पोलिस
२०२५ वानवडी फेक आयडेंटिटी वापरणारे विदेशी नागरिक अटक वानवडी पोलिस, एटीएस
Cell 6-1 Cell 6-2 Cell 6-3 Cell 6-4

Web Title: It has become clear that a network of terrorists is spreading in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?
1

Ahilyangar News: जामखेडच्या नृत्यांगनाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या माजी नगरसेवकाला अटक, काय आहे प्रकरण?

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार
2

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

Pune Crime: पुण्यात थरारक! चंदननगरात 18 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करत  निर्घृण हत्या; ३ जण जखमी
3

Pune Crime: पुण्यात थरारक! चंदननगरात 18 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करत निर्घृण हत्या; ३ जण जखमी

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
4

बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.