
MSEDCL, Crime News, Electricity Theft, Shirur News,
महावितरणच्या भरारी पथकाने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी केलेल्या तपासणीत संबंधित ग्राहक जॅमरच्या साहाय्याने वीजचोरी करत असल्याचे आढळले. २५ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५,००,०७९ युनिटची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने २ कोटी १२ लाख २१ हजार ३० रुपयांचे देयक देण्यात आले, तसेच याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास
परंतु ग्राहकाने स्वतःच्या गणनेनुसार केवळ ५ लाख २४ हजार १०९ रुपये भरणार असल्याचा दावा करून वीजजोडणीची मागणी केली होती. महावितरणतर्फे ॲड. सचिन खंडागळे व ॲड. गणेश डिंबळे यांनी विद्युत कायद्यातील कलम १३५ अंतर्गत निर्धारित केलेली संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच वीजजोडणी पूर्ववत करता येते, असा युक्तिवाद केला. सत्र न्यायालयाने मा. उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेऊन व महावितरणचा युक्तिवाद मान्य करून मे. साईप्रसाद दुध उत्पादक संस्थेचा अर्ज फेटाळून लावला.
वीजचोरी पकडली गेल्यास फौजदारी गुन्हा आणि मोठा आर्थिक दंड, अशी दुहेरी कारवाई होते. पैसे न भरता कायदेशीर पळवाट शोधणेही शक्य नाही. त्यामुळे वीजचोरी टाळावी. महावितरणतर्फे वीजचोरांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येते. आपल्या आसपास कुठे वीजचोरी होत असल्यास महावितरणचे मोबाईल ॲप, संकेतस्थळ किंवा १९१२ / १८००-२१२-३४३५ / १८००-२३३-३४३५ या टोल-फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.