Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 83 लाखांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुक तसेच ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तिघांची सायबर चोरट्यांनी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2025 | 01:40 PM
सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 83 लाखांना घातला गंडा

सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 83 लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुक तसेच ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तिघांची सायबर चोरट्यांनी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वानवडी पोलिसांत ६७ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी महिलेला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने २८ लाखाला गंडा घातला आहे. नोव्हेंबर २०२४ ते फेब्रवारी २०२५ कालावधीत ही फसवणूक झाली आहे. चोरट्यांनी त्यांना गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. नंतर महिलेला एका बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर परतावा म्हणून त्यांना काही रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. महिलेने या विश्वासाने ३ महिन्यात वेळोवेळी २८ लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम भरतानाच महिलेने संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना परतावा देण्याची मागणी केली. तेव्हा चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी महिलेला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.

बिबवेवाडीतील नागरिकालाही गंडा

बिबवेवाडी परिसरातील एका नागरिकाची देखील सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २५ लाख २० हजार रुपयांची फस‌वणूक केली. याबाबत बिबवेवाडी पोलिसांत ५४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.

कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा

कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

Web Title: It has been revealed that cyber thieves have cheated three people from pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट
1

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
2

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार
3

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य
4

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.