Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरट्यांची पण कमाल! पुण्यात चक्क पार्क केलेल्या रिक्षांची चाके चोरली

घर फोडणाऱ्या चोरट्यांनी 'कमाल'च केली असून, बंद घरे, दुकाने अन् गोडाऊन फोडत असतानाच चक्क मार्केटयार्ड परिसरात पार्क केलेल्या तीन रिक्षांचे चाके काढून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 20, 2025 | 01:39 PM
चोरट्यांची पण कमाल! पुण्यात चक्क पार्क केलेल्या रिक्षांची चाके चोरली

चोरट्यांची पण कमाल! पुण्यात चक्क पार्क केलेल्या रिक्षांची चाके चोरली

Follow Us
Follow Us:

पुणे : घर फोडणाऱ्या चोरट्यांनी ‘कमाल’च केली असून, बंद घरे, दुकाने अन् गोडाऊन फोडत असतानाच चक्क मार्केटयार्ड परिसरात पार्क केलेल्या तीन रिक्षांचे चाके काढून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीसही चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चोरट्यांनी हडपसरमध्ये स्टुडिओ, तर विश्रांतवाडी, बाणेरमध्ये बंद घरे फोडली आहेत. सोबत कोंढव्यात एक मेडिकल फोडल्याचे गुरूवारी दाखल गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे. याप्रकरणात मात्र, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद नाही. तक्रार देण्यास कोणी न आल्याने नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात घरफोडीच्या घटना ‌वाढल्या आहेत. घरफोड्यांसोबत, चेन स्नॅचिंग तसेच रस्त्यात अडवून लुबाडले जात आहे. अशातच चोरट्यांनी कमाल करत मार्केटयार्ड भागातून पार्किंगमध्ये उभा केलेल्या ३ रिक्षांची चाकेच चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. आता प्रकरणात नेमके गुन्हा दाखल होतो का, आणि पोलीस चाके चोर चोरट्याला पकडतात का, हे पहावे लागणार आहे. परंतु, पोलिसांकडून किरकोळ म्हणून दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना वाढण्यास कारण ठरत असल्याचे दिसत आहे.

हडपसरमध्ये चोरट्यांनी फोटो स्टुडिओच्या दरवाज्याचे कुलूप तोडून ३ लाख ७७ हजार रुपयांचा कॅमेरा, मोबाइल तसेच अन्य साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली आहे. हिंगणे मळा भागात चोरी झाली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत रोहीत तोडकर (वय ३७) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांचा हिंगणे मळा येथे फोटो स्टुडिओ आहे. मंगळवारी मध्यरात्री स्टुडिओचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी स्टुडिओतील कॅमेरा, मोबाइल, तसेच अन्य साहित्य चोरुन नेले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील पथकाने येथे धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास उपनिरीक्षक विलास सुतार करत आहेत.

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी

कोंढव्यातील मेडिकलचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २४ हजारांची रोकड चोरुन नेली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. तरुणाचे कोंढवा बुद्रुक गावठाणात मेडिकल आहे. मेडिकल बंद असताना चोरट्यांनी येथे चोरी केली. गल्ल्यातील २४ हजारांची रोकड चोरुन नेल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

घरफोडीत चार लाखांचा ऐवज चोरी

विश्रांतवाडी आणि बाणेर परिसरात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडत रोकड व इतर ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदारांचे आळंदी रस्त्यावरील कळस येथे घर आहे. ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी घर फोडून २ लाख ८८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. पाषाण-सूस रस्त्यावरील बाणेरमध्ये चोरट्यांनी सोसायटीतील फ्लॅटचे कुलूप उचकटून ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत बाणेर पोलिसांत ३६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

Web Title: It has come to light that thieves have stolen the wheels of parked rickshaws in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
2

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
3

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
4

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.