Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी

जयपूरमध्ये सरकारी नोकरी आणि कोट्यवधींच्या संपत्तीच्या हव्यासापोटी एका मुलीने सख्ख्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपघाताचा बनाव करून आईला भरधाव स्कॉर्पिओने चिरडण्यात आले. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी मुलीसह सात जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 02:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी नोकरी आणि मालमत्तेसाठी मुलीने आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी दिल्याचा आरोप.
  • भरधाव स्कॉर्पिओने धडक देऊन अपघाताचा बनाव रचला, मात्र तपासात सुनियोजित हत्या उघड झाली.
  • पोलिसांनी मुलीसह सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमधून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी आणि कोट्यवधींच्या मालमत्तेच्या हव्यासापोटी एका मुलीने आपल्या सख्ख्या आईच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. अपघाताचा बनाव रचत भरधाव स्कॉर्पिओने आईला चिरडून ठार मारले. सुरुवातीला अपघात वाटला, मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासातून हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार मुलीसह सात आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.

काय नेमकं प्रकरण?

मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नीरज शर्मा असे आहे. या जयपूर न्यायालयात एलडीसी (लॉवर डिव्हिजन क्लर्क) पदावर कार्यरत होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले होते, त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना ही सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र त्यांची मुलगी आयुषी हिची नजर त्या नौकरीवर आणि कुटुंबाच्या संपत्तीवर होती. तिला असे वाटले की वडिलांच्या निधनानंतर ही नौकरी तिला मिळेल, मात्र आई स्वतः कामावर रुजू झाल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. अखेर आईला रस्त्यातून हटवून अनुकंपा नोकरी आणि संपत्ती दोन्ही हडपण्याच्या उद्देशाने आयुषीने आपल्या नातेवाईकांसह मिळून क्रूर हत्येचा कट आखला.

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर

कशी केली हत्या?

या हत्येसाठी आयुषीने तिचा चुलता मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्याशी हातमिळवणी केली होती. या तिघांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा नावाच्या गुंडाला 7 लाख रुपयांची सुपारी दिली. नीरज शर्मा यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला एक थार गाडी भाड्याने घेतली आणि अनेक दिवस रेकी केली. तब्बल महिनाभर पाळत ठेवल्यानंतर, 3 जुलै रोजी जेव्हा नीरज शर्मा आपल्या मुलाला कोचिंग क्लासमधून सोडून घरी परतत होत्या, तेव्हा 130 किमी प्रतितास वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की नीरज यांचा मृतदेह 100 फूट दूर जाऊन पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

भावाने दिली तक्रार आणि सगळंच बिंग फुटलं

नीरज शर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ राकेश कुमार शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याने सांगितले की त्यांची बहीण आधीपासूनच मुलगी आयुषी, सासरची मंडळी आणि दीराच्या मुलाकडून मालमत्तेसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत होती. तसेच तिला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. पोलिसांनी आयुषीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आयुषी शर्मा, मोहन स्वरूप, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक केली आहे, तर या कटात महत्त्वाचा दुवा असलेला चुलत भाऊ बलराम उर्फ रवी हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

💡

Frequently Asked Questions

  • Que: आईच्या हत्येसाठी किती रुपयांची सुपारी देण्यात आली होती?

    Ans: 7 लाख रुपये.

  • Que: या प्रकरणाचा उलगडा कशामुळे झाला?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासामुळे.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: सात आरोपींना.

Web Title: Jaipur crime a premeditated murder not an accident a government job and daughter hired a contract killer for 7 lakh to have her mother murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.