Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर

पश्चिम बंगालमधील १२ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी नेले असताना आरोपीने कथितरित्या पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केल्याचे सांगितले असून या घटनेची चौकशी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 11:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १२ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार व हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस चकमकीत मृत्यूमुखी पडला.
  • गुन्ह्याची जागा दाखवताना आरोपीने कथितरित्या पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला.
  • पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमधील १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी नेले असताना आरोपीने कथितरित्या पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या कारवाईनंतर या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

काय घडलं नेमकं?

मंगळवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास बारुईपूर पोलीस ठाण्याचे पथक मुख्य आरोपी प्रबाश मंडल याला गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी सूर्यपूर भागात घेऊन गेले होते. मात्र ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच प्रबाशने एका पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून घेतली. त्याने पोलिसांवर एक राउंड गोळीबार केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी तात्काळ गोळीबार केला. ज्यात प्रबाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारुईपूर रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Solapur News: वडिलांनी कार घेऊन देण्यास नकार दिला… काही मिनिटांत 20 वर्षीय मुलाने घेतला धक्कादायक निर्णय

योगी आदित्यनाथ यांच्या ‘एन्काउंटर पॅटर्न’

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘एन्काउंटर पॅटर्न’ प्रमाणेच या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबाश मंडल याचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केलाय. बुधवार पहाटे झालेल्या या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

काय नेमकं प्रकरण?

दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बारुईपूरमध्ये ४ जुलैच्या संध्याकाळी १२ वर्षांची मुलगी आपल्या मित्राच्या वाढदिवसाचं गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी त्याच रात्री पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरु केला असता दुसऱ्या दिवशी सकाळी हाटजवळील एका तलावात पोत्यात भरलेला छिन्नविछिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस चकमकीत आरोपीचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहे.  तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून तिला जखमी केले गेले आणि ती जिवंत असतानाच पोत्यात बंद करून तलावात फेकून दिलं. पाण्यात बुडाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला.असे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणं आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आनंद सरदार, प्रबास मंडल आणि दिबाकर सरदार अशा ३ जणांना अटक केली होती. त्यातून आता प्रभास मंडल याचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे.

Satara Crime: साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून अंत, एकमेकांना वाचवण्याच्या नादात सगळेच चिकटले

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये.

  • Que: आरोपीला घटनास्थळी का नेण्यात आले होते?

    Ans: गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी आणि घटनाक्रमाची पडताळणी करण्यासाठी.

  • Que: पोलिसांनी गोळीबार का केला?

    Ans: आरोपीने कथितरित्या सर्व्हिस गन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केल्याने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: West bengal crime 12 year old girl raped and murdered something happened while the crime scene was being reconstructed that led to an encounter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • crime
  • Encounter News
  • West bengal

संबंधित बातम्या

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
1

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
3

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक
4

Navi Mumbai Police: अमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’; आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे नवी मुंबईकरांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.