काय घडलं नेमकं?
मंगळवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास बारुईपूर पोलीस ठाण्याचे पथक मुख्य आरोपी प्रबाश मंडल याला गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी सूर्यपूर भागात घेऊन गेले होते. मात्र ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच प्रबाशने एका पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून घेतली. त्याने पोलिसांवर एक राउंड गोळीबार केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी तात्काळ गोळीबार केला. ज्यात प्रबाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने बारुईपूर रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
योगी आदित्यनाथ यांच्या ‘एन्काउंटर पॅटर्न’
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘एन्काउंटर पॅटर्न’ प्रमाणेच या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबाश मंडल याचा पोलिसांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केलाय. बुधवार पहाटे झालेल्या या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.
काय नेमकं प्रकरण?
दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील बारुईपूरमध्ये ४ जुलैच्या संध्याकाळी १२ वर्षांची मुलगी आपल्या मित्राच्या वाढदिवसाचं गिफ्ट खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती परत आलीच नाही. कुटुंबीयांनी त्याच रात्री पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरु केला असता दुसऱ्या दिवशी सकाळी हाटजवळील एका तलावात पोत्यात भरलेला छिन्नविछिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस चकमकीत आरोपीचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून तिला जखमी केले गेले आणि ती जिवंत असतानाच पोत्यात बंद करून तलावात फेकून दिलं. पाण्यात बुडाल्यामुळेच तिचा मृत्यू झाला.असे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणं आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आनंद सरदार, प्रबास मंडल आणि दिबाकर सरदार अशा ३ जणांना अटक केली होती. त्यातून आता प्रभास मंडल याचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे.
Ans: पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये.
Ans: गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी आणि घटनाक्रमाची पडताळणी करण्यासाठी.
Ans: आरोपीने कथितरित्या सर्व्हिस गन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केल्याने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.






