
Jalgaon Crime: ज्यांच्यावर होता जीवापाड विश्वास, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे आई-वडील आपल्या मुलासाठी जीवाचं रान करतात, तिथेच जळगावच्या मोहाडी गावात आई-वडिलांनीच आपल्या पोटच्या तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Jalgaon Crime:
ही घटना 31 जुलैची आहे. मोहाडी गावात राहणारा राधेश्याम हरसिंग राठोड, वय 26 वर्ष, या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी आली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात आलं होतं. घरच्यांनीच पोलिसांना कळवलं की मुलाने आत्महत्या केली. पण पोलिसांना या प्रकरणात काहीतरी गडबड वाटली. आत्महत्या वाटत असली तरी काही गोष्टी संशयास्पद वाटत होत्या.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू केला आणि तपासातून जे सत्य बाहेर आलं ते ऐकून पोलिस पण हादरले.तपासात समोर आलं की राधेश्यामने आत्महत्या केलीच नव्हती, तर त्याचा खून करण्यात आला होता. खून करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्याचेच आई-वडील आणि सख्खा भाऊ होते. दारूच्या व्यसनाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल उचलेल्याच सांगितले जात आहे.
मयत राधेश्यामला दारूचं प्रचंड व्यसन होतं. तो रोज दारू पिऊन घरी यायचा आणि आई-वडिलांना त्रास द्यायचा, शिवीगाळ करायचा, भांडण करायचा. त्याच्या या रोजच्या त्रासाला त्याचे आई-वडील पुरते कंटाळून गेले होते. रोजचा जाच, भांडण यामुळे घरातलं वातावरण खराब झालं होतं.या त्रासाला कंटाळूनच त्याच्या आई-वडिलांनी आणि भावाने त्याला संपवण्याचा कट बनवला.
Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक …
31 जुलैच्या दुपारी तिघांनी संगनमत करून राधेश्यामला दोरीने गळफास देऊन त्याचा जीव घेतला. जागीच त्याची हत्या केली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी ज्या दोरीने त्याला फास दिला होता ती दोरी लगेच जाळून टाकली. त्यानंतर सगळ्यांसमोर असा बनाव केला की राधेश्यामने स्वतःच आत्महत्या केली आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
पोलिसांना खोटी माहिती दिली.पोलिसांनी सत्या उघडकीस आणले. त्यांनी आत्महत्येच्या घटनेकडे वेगळ्या नजरेने बघून आजूबाजूला चौकशी केली, पुरावे गोळा केले. त्यांच्या चौकशीत घरच्यांच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिघांनी आपला गुन्हा कबूल केला.
Jalgaon News: उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात ‘एल्गार’! सकल बौद्ध …
या प्रकरणात पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मीराबाई हरसिंग राठोड (मयताची आई), हरसिंग उर्फ हरचंद नथ्थु राठोड (मयताचे वडील) आणि सचिन हरसिंग राठोड (मयताचा सख्खा भाऊ गुन्हेगाराची नावे आहेत. तिघेही मोहाडीचेच राहणारे होते.
आई-वडिलांनीच आपल्या मुलाचा जीव घ्यावा ही घटना खूपच वेदनादायक आहे. दारूच्या व्यसनाने एका अख्ख्या कुटुंबाचा घात केला. एका मुलाचा जीव गेला आणि आता आई-वडील आणि भाऊ जेलमध्ये गेले.