
crime (फोटो सौजन्य: social media)
Amravati Crime: भर बाजारात टोळक्याचा थरार; अमरावतीत 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने हत्या, परिसरात तणाव
धनश्री ही तरवाडे बुद्रुक गावातील शाळेत शिकत होती. १२ डिसेंबरला धनश्री सकाळी १० वाजता शाळेत गेली. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटली. त्यानंतर दोन मुलं घरी आली पण ती घरी आलीच नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घ्याला सुरुवात केली मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही तिचा शोध घ्याला सुरुवात केली. याघटनेमुळे धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहे.
चुकीची माहिती देऊन दिशाभूल
मुलीच्या वडिलांनी एका ठिकाणी एक बाई बसली होती, तिच्याजवळ चौकशी केली. तेव्हा तिच्याजवळ चौकशी केली. तेव्हा आपल्या मुलीसोबत एक तांड्यातील मुलगी होती, ती तांड्याच्या दिशेने गेली असल्याचं त्या बाईने सांगितलं. दुसऱ्या एकाने तिच्याकडे चौकशी केली असता त्याला दुसरीच माहिती दिली. आपल्या मुलीसोबत इतर दोन मुली होत्या. एक गावातील आणि एक मुलगी तांड्यातील होती अशी माहिती त्या बाईने दिली. तर एका चुलत भावाने पुन्हा तिच्याकडे चौकशी केली असता तिसऱ्यांदा तिने आणखी वेगळं उत्तर दिलं. आपली मुलगी कडगाव रस्त्याच्या दिशेने गेली असल्याचं त्या बाईने सांगितलं. त्यामुळे धनश्रीच्या कुटुंबीयांची दिशाभूल झाली.
पोलीस तपास सुरु
गेल्या तीन ते चार दिवसांपासून धनश्री बेपत्ता असल्याने धनश्रीचे कुटुंबीय चिंतेत आहे. एलसीबी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांची विचारपूस केली आहे. धनश्रीचे शाळेचे दफतर हे गावाच्या वेशी बाहेर सापडले आहे. पोलीस प्रशासनाकडून चिमुकलीचा कसून तपास घेण्यात येत आहे.
Crime News : दौंड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Ans: 12 डिसेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर ती घरी परतली नाही.
Ans: धनश्रीचे शाळेचे दप्तर गावाच्या वेशीबाहेर आढळले.
Ans: एलसीबी, वरिष्ठ अधिकारी, शिक्षकांची चौकशी व कसून शोधमोहीम सुरू आहे.