Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गाव हादरले. पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडलेले पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले काही वेळातच रेल्वे मार्गावर मृतावस्थेत आढळून आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Aug 27, 2026 | 01:52 PM
Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon Accident news: काळीज पिळवटून टाकणारी घटना; एकाच कुटुंबातील चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

Follow Us
Follow Us:
  • एकाच कुटूंबातील चौघांचा दुर्दैवी अंत
  • पती, पत्नीसह दोन मुलांची आत्महत्या
  • एकाचवेळी कुटूंब संपल्याने ग्रामस्थांमध्ये शोककळा
Jalgaon Accident news: जळगावच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी पहाटे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गाव हादरले. पहाटेच्यावेळी  पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले  असे एकाच कुटूंबातील चौघेजण बाहेर पडले होते. काही वेळातच  रेल्वे मार्गावर आपलं जीवन संपवल्याची माहीती  ग्रामस्थ व परीसरापर्यंत पोहचली  आणि सर्वत्र शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती भिल आणि एक मुलगा सनी इयत्ता दुसरीत तर दुसरा अंगणवाडीत असलेला राज यांना सोबत घेऊन पहाटे चारच्या सुमारास घरातुन बाहेर पडले होते. त्यानंतर काहीवेळातच अमळनेर मधील धावत्या रेल्वे समोर जाऊन  आत्महत्या केल्याचा धक्कादायक समोर आला. यानंतर गुरुवारी पहाटे ४.४०च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.

Dog Crime: कुटुंबीयांच्या जुन्या वादातून 2 मुक्या जीवांचा बळी; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. सहाय्यक गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करुन  पंचनामा करण्यात आला. या घटनेची बातमी  परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये शोककळेचे वातावरण पसरले.

प्राथमिक माहितीनुसार, भिल कुटुंबातील सदस्य पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच रेल्वे प्रशासनाकडून अमळनेर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, हे कुटुंब कोणत्या कारणामुळे घराबाहेर पडले आणि त्यानंतर नेमकी कोणती घटना घडली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

दरम्यान, प्राथमिक चर्चेत कौटुंबिक कारणाचा उल्लेख होत असला तरी त्या घटनेला  पोलिसांकडून अद्याप पुष्टीकरण झालेले नाही. कुटुंबातील कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा अजून कोणते कारण होते का, यासह विविध शक्यतांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेपूर्वी कुटुंबात कोणता वाद किंवा तणाव होता का, याचीही माहिती घेतली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.

 

 

Web Title: Jalgaon crime a heart wrenching incident four members of the same family took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • crime news
  • jalgaon Crime
  • Maharashta Breaking News

संबंधित बातम्या

येरवडा जेलमध्ये शिजला होता सायबर फसवणुकीचा कट; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून भावी डॉक्टरसह दोघांना अटक
1

येरवडा जेलमध्ये शिजला होता सायबर फसवणुकीचा कट; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून भावी डॉक्टरसह दोघांना अटक

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू
2

Pimpari-Chinchwad : वर्षभरात पुन्हा घडली दुर्घटना; बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
3

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

चंद्रपुरात बनावट गुणपत्रिका, डिग्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; एक जण अटकेत पण सूत्रधारच फरार
4

चंद्रपुरात बनावट गुणपत्रिका, डिग्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; एक जण अटकेत पण सूत्रधारच फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.