Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: क्राईम थ्रिलरलाही लाजवेल असा कट; बनावट अपघात दाखवून विम्याचे 50 लाख लाटण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यात विमा मिळवण्यासाठी मृत व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या कटाची मास्टरमाइंड मृताची पत्नी असून विमा एजंट, डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह 9 जणांना अटक करण्यात आली आ

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 11:36 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वर्षभरापूर्वी नैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा बनावट अपघात दाखवून 50 लाखांचा विमा दावा.
  • या कटाची मास्टरमाइंड मृताची पत्नी; विमा एजंट, डॉक्टर व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग.
  • पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक; मोठ्या विमा फसवणूक रॅकेटचा संशय.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एका क्राईम थ्रिलर चित्रपटाला लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. एक वर्षांपूर्वीच नैसर्गिक मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचून ५० लाख रुपयांचा विमा हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण कटाची मास्टरमाइंड चक्क मृतांची पत्नी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात विमा एजंट, डॉक्टर आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनीही साथ दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Dharashiv Accident: टायर फुटल्याने भरधाव कार चहाच्या टपरीत घुसली; धाराशिवमध्ये माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाची सुरुवात १९ एप्रिल 2025 रोजी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या एका अपघाताच्या नोंदीने झाली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दहीवाड फाटा परिसरात एका काळ्या रंगाच्या थार गाडीने राजेंद्र जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती आणि या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेच्या आधारे मृताची पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा विमा दावा दाखल केला होता. यासाठी रीतसर एफआयआर आणि शवविच्छेदन अहवाल देखील सादर करण्यात आला होता.

संशय आला आणि…

विमा कंपनीला अरुणा जाधव हिने केलेल्या दाव्याबाबत संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली. तेव्हा तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. ज्या राजेंद्र जाधव यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले होते, त्यांचा मृत्यू प्रत्यक्षात एक वर्षापूर्वीच आजारपणामुळे झाला होता. त्यांना विम्याची मोठी रक्कम पाहिजे होती म्हणून त्यांच्या मृत्यूला अपघाताचे रूप देण्यात आले.

या कटात कोण कोण सहभागी

या कटात मृत राजेंद्र यांचा भाऊ, विमा एजंट, एक खाजगी डॉक्टर आणि चार पोलीस कर्मचारी यांचा सहभाग आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी एकूण ९ जणांना अटक केली असून त्यांच्यावर फसवणुकीसह विविध कमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीही अशाच प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून इतर कंपन्यांची फसवणूक केली आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणामुळे महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागातील भ्रष्ट साखळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Mumbai Crime: ‘एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील…चारित्र्यावर आरोप, मानसिक छळ; MDS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय नेमकं प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात काय फसवणूक करण्यात आली?

    Ans: वर्षभरापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करून 50 लाखांचा विमा दावा करण्यात आला.

  • Que: या कटात कोणाचा सहभाग असल्याचे समोर आले?

    Ans: मृताची पत्नी, त्याचा भाऊ, विमा एजंट, एक डॉक्टर आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या विमा फसवणूक रॅकेटचा तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime a plot that would put even a crime thriller to shamean attempt to swindle 50 lakh in insurance money by staging a fake accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Hariyana Crime: माहेरी आलेल्या मुलीला खोलीत नेलं अन्… सावत्र बापाच्या कृत्याने खळबळ
1

Hariyana Crime: माहेरी आलेल्या मुलीला खोलीत नेलं अन्… सावत्र बापाच्या कृत्याने खळबळ

Odisa Crime: संतापजनक! ३ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी गंभीरपणे जखमी
2

Odisa Crime: संतापजनक! ३ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी गंभीरपणे जखमी

Chandrapur Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! आई उपचार घेत असताना 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; त्याच दिवशी आईचीही प्राणज्योत मालवली
3

Chandrapur Crime: काळजाचा ठोका चुकवणारी घटना! आई उपचार घेत असताना 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; त्याच दिवशी आईचीही प्राणज्योत मालवली

‘मैदानावर जाते’ म्हणत घराबाहेर पडली, काही तासांत शिक्षिकेचा मृतदेह सापडला; छ. संभाजीनगरात खळबळ
4

‘मैदानावर जाते’ म्हणत घराबाहेर पडली, काही तासांत शिक्षिकेचा मृतदेह सापडला; छ. संभाजीनगरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.