काय घडलं नेमकं?
स्तुती सोनवणे (२४ वर्षीय) नवी मुंबईतील एका डेंटल कॉलेजमध्ये एमडीएसचे शिक्षण घेत होती. ती आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत एंटॉप हिल परिसरात राहत होती. तिचे मोहम्मद फौझील नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पोलिसांना घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यात तिने आपल्या प्रेमप्रकरणाबाबत खळबळजनक अनुभव लिहिले.
सुरुवातीला या दोघांचे संबंध चांगले होते, मात्र कालांतराने फौझील तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. ती तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ आरोप करत होते. ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती.
श्रद्धा वालकर केसचा उल्लेख
तिने सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाचा उल्लेख केला आहे. स्तुतीचे मित्रमैत्रिणी तिला मस्करीत म्हणायचे की, “एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील”. सुसाईड नोटमध्ये या वाक्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. प्रियकरासोबतच्या नात्यात तिला किती असुरक्षित वाटत होते, हे या वाक्यावरून स्पष्ट होत आहे.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्तुती तिच्या खोलीत होती, मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत ती बाहेर न आल्याने कुटुंबियांना संशय आला. त्यांनी वारंवार वाजवूनही प्रतिसाद मिळाला नाही, अखेर दरवाजा तोडून पहिले असता तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
पुढील तपास सुरु
एंटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून जप्त केलेली ६ पानांची सुसाईड नोट हा या प्रकरणातील मुख्य पुरावा मानला जात आहे. पोलीस आता या सुसाईड नोटच्या आधारे मोहम्मद फौझीलची चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Nashik Crime: फेसबुकवरून मैत्री, क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; नाशिकच्या तरुणाकडून 53 लाख लंपास
Ans: स्तुती सोनावणे नावाची 24 वर्षीय तरुणी असून ती डेंटल कॉलेजमध्ये एमडीएसचे शिक्षण घेत होती.
Ans: प्रियकराच्या सततच्या संशय, चारित्र्यावर आरोप आणि मानसिक छळामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.
Ans: घटनास्थळावरून 6 पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यावरून पोलिस तपास करत आहेत.






