Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: ‘मी जिवंत आहे!’ तरुणीच्या एका वाक्याने हत्याकांडाचा संपूर्ण तपास उलटला; नेमकं काय प्रकरण?

बुलढाण्यात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह शिवानी कळमेकरचा असल्याचा संशय घेत पोलिसांनी तिच्या वडिलांना व भावाला अटक केली. मात्र 20 दिवसांनी शिवानी जिवंत हजर झाल्याने प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 08:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिवानीच्या हत्येच्या संशयावरून वडील आणि भावाला अटक करण्यात आली होती.
  • 20 दिवसांनी शिवानी स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन जिवंत असल्याचे सांगितले.
  • अर्धवट जळालेला मृतदेह नेमका कोणाचा, याचा तपास अद्याप सुरू आहे.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील एका गूढ हत्याकांडाला आता धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचा तपास करताना पोलिसांनी बेपत्ता असलेल्या तरुणीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली होती. मात्र तब्बल 20 दिवसांनंतर तीच तरुणी जिवंत पोलिस ठाण्यात हजर झाल्याने संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

काय नेमकं प्रकरण?

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. बुलढाणा पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, खगनार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकी गावातील 26 वर्षीय शिवानी कळमेकर बेपत्ता आहे. पोलिसांना वाटलं हा मृतदेह शिवानी कळमेकरचा आहे. त्यामुळे त्यांनी शिवानीचे वडील बापूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांना शिवानीच्या हत्येच्या संशयावरून ताब्यात घेतलं. दोघांना जळगाव जामोद न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली.

Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं! ट्रॅव्हल्स-दुचाकीची समोरासमोर धडक, 4 तरुणांचा जागीच मृत्यू; ओळख पटवणंही कठीण

एवढेच नाही तर पोलिसांनी न्यायालयाला दोघांनी शिवणीची हत्या आम्हीच केल्याचे कबुल देखील केले. त्यामुळे न्यायालयाने दोघानांही न्यायालयीन कोठडीत पाठवले. दोघेही न्यायालयाने कोठडीत असताना अचानक २० दिवसांनी म्हणजेच २८ मे रोजी शिवणीने खगनार पोलिसात हजर होऊन मी जिवंत असल्याचा जबाब दिला. माझ्या वडिलांना व भावाला मुक्त करा अशी मागणी देखील केली. न्यायालयात शिवानी जिवंत असून तिच्या हत्याकांडप्रकरणी कारागृहात असलेले तिचे वडील बाबूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांच्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शेगाव न्यायालयाने दोघांनाही दोषमुक्त केल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. त्यामुळे आज त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. आता या जबाबाने संपूर्ण हत्याकांडाचा तपास उलटला.

आता या जबाबाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. हा मृतदेह शिवणीचा नाही तर मग कोणाचा? आणि कोणत्या तथ्यावर शिवानीच्या भावाला आणि वडिलांना अटक करण्यात आली? बुलढाणा पोलिसांनी कुठल्याही पुराव्या अभावी व फॉरेन्सिक अहवाल येण्याच्या अगोदरच अनोळखी मृतदेह शिवानीचा असल्याचं जाहीर करून टाकलं. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात आता पर्यंत थातूरमातूर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचाऱ्यांना मुख्यालय जमा केल आहे. आता या प्रकरणातील अर्धवट जळालेल्या महिलेची ओळख पोलीस कसे पटवतात हे बघणं महत्त्वाचं आहे.

Solapur News : बार्शीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; रोख रकमेसह 2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवानी कळमेकर प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली होती?

    Ans: शिवानीचे वडील बाबूराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना हत्येच्या संशयावरून अटक करण्यात आली होती.

  • Que: प्रकरणाला धक्कादायक वळण कसे मिळाले?

    Ans: बेपत्ता असलेली शिवानी 20 दिवसांनी पोलिस ठाण्यात हजर झाली आणि आपण जिवंत असल्याचे सांगितले.

  • Que: सध्या या प्रकरणातील मुख्य प्रश्न कोणता आहे?

    Ans: राजुरा धरण परिसरात सापडलेला अर्धवट जळालेला अनोळखी मृतदेह नेमका कोणाचा आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Jalgaon crime i am alivea young womans single sentence turns the entire murder investigation upside down what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून
1

Mumbai Crime: मुंबई हादरली! पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटरवर पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केला खून

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
2

…आणि छाती दाबणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नाही; पटना हायकोर्टाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

Raigad Crime : रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
3

Raigad Crime : रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Haryana Crime: तीन दिवसांपूर्वीच एकत्र राहायला आले…; प्रेयसीचा गळा चिरून हत्या, काही तासांतच प्रियकराने रेल्वेखाली मारली उडी
4

Haryana Crime: तीन दिवसांपूर्वीच एकत्र राहायला आले…; प्रेयसीचा गळा चिरून हत्या, काही तासांतच प्रियकराने रेल्वेखाली मारली उडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.