Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Jalgaon News: जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील सार्वजनिक बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे गंभीर प्रकरणात रूपांतर झाले. पोलिसांत तक्रार देण्यासाठी दुचाकीने जात असलेल्या शेतकरी ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांचा मुलगा यश मोरे यांचा कारने पाठलाग करून हिवरखेडा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 12:00 PM
Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बाक हलवण्याच्या वादानंतर कारने दुचाकीला धडक; ज्ञानेश्वर मोरे यांचा मृत्यू.
  • मुलगा यश मोरे गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी जळगावला हलवले.
  • बाळू उत्तम जोशी पोलिसांच्या ताब्यात; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.
जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील जागेतील सार्वजनिक बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून वादाचे पर्यवसान बाप-लेकाला कारने चिरडून ठार मारण्याच्या प्रयत्नात झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कुंभारी बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांचा मृत्यू झाला, तर मुलगा यश हा गंभीर जखमी झाला. Jalgaon News:

नेमकं प्रकरण काय?

जळगाव-छत्रपती संभाजीनगर (Jalgaon- Chhatrapati Sambhajinagar) राष्ट्रीय महामार्गावरील हिवरखेडा फाट्याजवळ शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कुंभारी बुद्रुक येथे घरासमोरील जागेतील बाक इतरत्र हलविण्याच्या कारणावरून ज्ञानेश्वर मोरे यांचा काही व्यक्तींशी वाद झाला होता. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ज्ञानेश्वर मोरे व त्यांचा मुलगा यश मोरे हे दोघे दुचाकीने पहरकडे निघाले होते. दरम्यान, त्यांच्या मागावर असलेल्या बाळू उत्तम जोशी व अन्य दोघांनी (रा. कुंभारी) कार क्रमांक एमएच १९ ईए १७६९ ने पाठलाग केला. हिवरखेडा फाट्याजवळ कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तर यश हादेखील गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांनीही तपासाबाबत सूचना केल्यात.

एक ताब्यात, गुन्हा दाखल करण्याचे कामकाज

घटनेतील संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बाळू उत्तम जोशी यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

पुढील तपास पाहूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पात्रे करीत आहेत. मयत ज्ञानेश्वर मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोरे यांच्या मृत्यूमुळे कुंभारी बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून, या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Jalgaon jamner kumbhari budruk car bike accident dnyaneshwar more death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Crime in Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Weather:  राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर
2

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
3

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
4

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.