crime (फोटो सौजन्य: social media )
Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली होती. चाळीसगाव शहरात 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेननंतर शहरात मोठी दहशत पसरली होती. पोलिसांनी तीन आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.
कसे केले आरोपींना अटक?
शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे. या तिघांना चाळीसगाव शहरातूनच सापळा रचून अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी आरोपींची पायी धिंड काढली आहे.
कोयत्याच्या प्रहारामुळे प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यानंतर शहरात दहशत निर्माण झालेली भीती आणि आरोपींची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींची पायी धिंड काढली. यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. या काळात पोलीस आरोपींकडून अधिक माहिती घेऊन हल्ल्याच्या मागचे कारण त्यामागील इतर कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहे.
बारावीत शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, कारण…
नागपुरात एका महाविद्यालयीन तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रांजली दिलीप ननकटे (वय १८, रा. सिरसी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सिरसी येथील रहिवासी तथा उमरेडमधील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या प्रांजली हिने रुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
प्रांजली उमरेड येथील धनगर मोहल्ल्यात पडवे यांच्या घरी भाड्याने राहत होती. तिच्यासोबत तिचे दोन भाऊ एक दहावी आणि दुसरा आठवीत शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी ती आपल्या मूळ गावी सिरसी येथे गेली होती. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती पुन्हा उमरेड येथे आपल्या खोलीवर परतली. त्यावेळी तिचे दोन्ही भाऊ गणपती सणानिमित्त मोठ्या आईकडे मुक्कामी गेले होते. सायंकाळी घरी परतलेल्या भावांनी खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहिले. त्यांनी बरेच आवाज दिले. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने लहान भावाने मागच्या बाजूच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रांजली पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; सकाळी कामावर जाताना काळाचा घाला