पुणे : पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात प्रेमसंबंधातून ब्रेकअप झाल्यानंतर एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉयच्या वेषात आलेल्या आरोपीने तरुणीवर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने पिस्तुलातून गोळी न उडाल्याने तरुणी बचावली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Dombivali Crime: संतापजनक! सोशल मीडियावरून जाळ्यात ओढलं, अश्लील व्हिडीओ काढले आणि व्हायरल केले…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ही २४ वर्षीय असून ती एमबीएचा अभ्यासक्रम करत आहे. ती बाणेर भागातील एका खासगी कंपनीत इंटर्नशिप घेत आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ती कंपनीच्या आवारात प्रवेश करत असतांना आरोपीने तिला अडवलं. त्याने घरपोच खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान केला होता. तोंडाला मास्क लावल्याने सुरुवातीला तरुणीला त्याची ओळख पटली नाही.
पीडित तरुणीला अडवल्यानंतर आरोपीने बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने नकार दिला. यामुळे संतापातून त्याने आपल्या जवळील पिस्तूल काढले आणि तिच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेत गोळी सुटली नाही. दरम्यान तरुणीने आरडाओरड केली तेव्हा आरोपीने तिथून पळ काढला.
ब्रेकअप झाल्यामुळे रचला कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ पासून तरुणी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले होते. त्यामुळे संतापून आरोपीने तरुणीवर हल्या करण्याचा कट रचला. घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने थेट बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलसांनी तात्काळ तपास सुरु करत गुन्हे शाखा युनिट ४च्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करत असून सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कोल्हापूरच्या शिरोलीत भरदिवसा गोळीबार; सलग तीनवेळा फायरिंगने परिसरात खळबळ
किरकोळ वाद, मारामारी आणि थेट गोळीबार या घटनेमुळे टोप आणि पुलाची शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी उपस्थित जमावातील एकाने प्रसंगावधान दाखवत आरोपीचा रिव्हॉल्वर रोखलेला हात वर केला. त्यामुळे हा गोळीबार हवेत होऊन एकाचा जीव वाचला. अन्यथा घटनास्थळी वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते. सलग तीन वेळा गोळीबार करून आरोपी स्वतः शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला.
गणेश अर्जुन शेलार (वय ४२, रा. संभापूर, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. शिये फाटा, टोप हद्दीत येथे फेडरल बँकेसमोर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा गोळीबार झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबबत मार्गदर्शन व सूचना केल्या.