अज्ञात चोरट्यांची वृद्ध दाम्पत्यास मारहाण; 6 तोळे सोन्याचे दागिनेही केले लंपास
जळगाव: जळगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. मृत तरुणाचं नाव १९ वर्षीय साहिल शब्बीर तडवी असं आहे. या तरुणाचा घातपात झाला आहे. त्याची हत्या करण्यात आली आहे, असा संशय साहिल तडवीच्या कुटुंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मृत तरुणाच्या कुटुंबियांसह समाजबांधवांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल आहे. लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत साहिल ताडवीच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
Karad Crime: चोरट्यांनी घरात जाऊन कोयत्याचा धाक दाखवला अन्…; ‘त्या’ कुटुंबासोबत नेमके घडले काय?
नेमका प्रकरण काय आहे?
जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावातील साहिल शब्बीर तडवी नावाचा तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमका साहिल याचा मृत्यू कश्यामुळे झाला. त्याचा मृतदेह विहिरीत कसा आला? हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या कुटुंबाकडून या प्रकरणात घातपात आणि हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं, त्यांना फाशी व्हावी अशी मागणी साहिलच्या कुटुंबानं केली आहे. या प्रकरणात साहिलच्या कुटुंबानं जळगावच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
साहिलच्या कुटुंबाचा आरोप काय?
काही दिवसांपूर्वी गावातीलच एका व्यक्तीनं कौटुंबिक वादातून मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. याच कौटुंबिक वादातून त्या व्यक्तीने काही जणांना सोबत घेऊन मुलाला मारहाण करत त्याचा खून केल्याचा संशय मृत तरुण साहिल तडवीच्या आई-वडिलांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबातील तसेच इतर समाजबांधवांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
HIT AND RUN: मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू