Missi Roti Recipe : मिस्सी रोटी हा पदार्थ हेल्दी आणि टेस्टी कॅटेगरीत जातो. ही एक अशी चवदार चपाती आहे जी कोणत्याही भाजीशिवाय चवीला रुचकर लागते. झटपट काही चविष्ट बनवायचं असल्यास किंवा लहान मुलांना पाैष्टिक काही खाऊ घा
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मिस्सी रोटी ही गव्हाचे पीठ, बेसन आणि काही मसाल्यांपासून तयार केली जाते.
भाजी बनवण्याचा कंटाळा आला असल्यास ही रोटी बनवून खाल्ली जाऊ शकते.
लहान मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय ठरते.
मिस्सी रोटी ही उत्तर भारतातील पारंपरिक आणि पौष्टिक रोटी आहे. बेसन आणि गव्हाचे पीठ यांचे मिश्रण करून तयार केली जाणारी ही रोटी चवीला थोडी मसालेदार, बाहेरून हलकी खरपूस आणि आतून मऊ लागते. कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि विविध मसाल्यांमुळे तिची चव आणखी खुलते. रोजच्या पोळीला काहीतरी वेगळा पर्याय हवा असेल, तर मिस्सी रोटी नक्की करून पाहता येते. दही, लोणचे, हिरवी चटणी किंवा भाजीसोबत ही रोटी उत्तम लागते. चला याची रेसिपीजाणून घेऊया.