(फोटो सौजन्य: Pinterest)
टेकडीवरुन प्रेयसीला दिला धक्का
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी दामुनगरच्या मागे असलेल्या डोंगराळ भागात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर समतानगर पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनेस्थळी दाखल झाले आणि त्यांनी चाैकशीला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाला सील करुन फॉरेंसिक टीमच्या मदतीने वैज्ञानिक पुरावे गोळा केले. यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.
मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील लोकांची चौकशी केली. हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासल्या आणि मृताची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक पुराव्यांचा वापर केला. तपासात उघड झाले की, मृत मुलीचे सुरज मारुती नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
डिलिव्हरी बाॅयला केली अटक
तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या शोधकार्याला सुरुवात केली. तपासात आरोपीची कथित भूमिका समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला अटक केली. आरोपी व्यावसायाने एक डिलिव्हरी बाॅय आहे. पोलिस सध्या त्याची चाैकशी करत असून हत्येचा संपूर्ण कट आणि घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासात हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही हत्या पूर्वनियोजित होती की रागाच्या भरात घडली याचाही तपास पोलिस करत आहेत.
तपासानंतर होणार कायदेशीर कारावाई
पोलिस सध्या आरोपीची कसून चाैकशी करत असून हत्येमागचे खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे डीसीपी गजानन राजमाने यांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील खरा हेतू समजेल आणि यानंतरच आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.






