Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जामखेड नृत्यांगना आत्महत्या प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा? BJP–NCP च्या नेत्यांचे एकमेकांकडे बोट

जामखेडच्या नर्तिका दिपाली पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात माजी नगरसेवक संदीप गायकवाड अडकले आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहे. त्यावर आता आरोप प्रत्यारोप होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 08, 2025 | 05:48 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • जामखेड नृत्यांगना आत्महत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप
  • माजी नगरसेवक संदीप गायकवाड याला अटक
  • गायकवाड कोणत्या पक्षाचे? भाजप-राष्ट्रवादीत वाद
जामखेडच्या कला केंद्रातील नर्तिका दिपाली पाटील हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात अडकलेला जामखेडचा माजी नगरसेवक संदीप गायकवाड़ कोणता पक्षाचा ? यावरुन सोशल मीडिया वॉर सुरू असून मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले यांनी संदीप गायकवाड हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असल्याचे सांगितले आहे; तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी गायकवाड हा भाजपचा असल्याचे सांगून नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणूकील प्रचार सभा व अन्य बॅनर्स पुरावे दिले आहेत.

याच दरम्यान गायकवाड याने शिंदे सेनेची वाटही धरली होती. तो ही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गायकवाड किती चलाख राजकारणी होता हे आता स्पष्ट होत आहे. मात्र नर्तिका दिपाली पाटीलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने त्याची रवानगी पोलिस कोठडीत झाली.

Crime News : नांदेडमध्ये कत्तलीसाठी गोवंश वाहतूक; गुन्हे शाखा पोलिसांची थेट कारवाई

दिपाली आणि तिचा पती काही वर्षापासून एकमेकांपासून दूर राहत होते. दिपालीला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघे माध्यमिक शिक्षण घेत आहेत. त्यांचा सांभाळ आजी करत होती मात्र सगळा कुटुंबाचा भार दिपालीच पेलत होती. दिपालीच्या मृत्यूमुळे ती दोन लेकर पोरकी झाली आहेत. त्या कुटुंबाच्या पुढे उदरनिर्वाहाच प्रश्न निर्माण झाला असून यासंदर्भात मदतीचा हात पुढे करण्यासाठी कोणी धजावले नाही. मात्र तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या निरनिराळ्या पक्षात काही काळासाठी असल्यावरून राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

गायकवाडच्या बेडुकउड्या

नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत माजी नगरसेवक संदीप गायकवाड याने उमेदवारी मिळविण्याचा चंग बांधला होता. त्याने शिंदे सेनेची वाटही धरली होती. शिवसेनेच्या उमेदवारांसोबतचा एक फोटो सोशल मेडीयात व्हायरल होत आहे. असे असले तरी संदीप गायकवाड याची पत्नी लता गायकवाड यांनी भाजपकडून प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढविली; निवडणूक प्रचार यंत्रणेत माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा देखील सहभागी होता; त्यामुळे गायकवाड कोणत्या पक्षात आहे? हे सिद्ध होते.

Hyderabad News: हृदय पिळवटणारी घटना! 30 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं कळलंच नाही! ज्येष्ठ आई-वडिलांसोबत 4 दिवस मृतदेह घरातच

गायकवाड कोणत्या पक्षाचा ? याही पेक्षा आत्महत्या करणाऱ्या नर्तिका दिपाली पाटील हिच्या आईने पोलिसात दिलेली तक्रार आणि त्यानुसार दाखल झालेला गुन्हा लक्ष वेधणारा आहे. दिपालीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.

Web Title: Jamkhed dancer suicide case bjp ncp arguements over sandeep gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahmednagar Crime
  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल
1

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल
2

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा
3

Chhatrapati Sambhajinagar Crime News: प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहितेची हत्या, धारदार शस्त्राने चिरला गळा

डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.