Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

ATM Card Scam: एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटमध्ये फेविक्विक लावून नागरिकांचे कार्ड अडकवायचे आणि मदतीच्या बहाण्याने PIN मिळवून खात्यातील पैसे लंपास करणाऱ्या टोळीचा कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. एका आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर बिहारला पळून जाणाऱ्या आणखी तिघांचा पोलिसांनी पटना एक्स्प्रेसमध्ये पाठलाग केला..

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2026 | 04:31 PM
फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Follow Us
Follow Us:
  • ATMमध्ये फेविक्विक लावून नागरिकांना गंडा
  • पटना एक्स्प्रेसमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करत टोळी जेरबंद
  • कल्याण पोलिसांनी चौघांच्या टोळीचा केला पर्दाफाश
ATM Card Scam: एटीएम मशीनमध्ये फेविक्विक लावून नागरिकांचे कार्ड अडकवायचे आणि त्यानंतर मदतीच्या बहाण्याने गोपनीय माहिती मिळवून खात्यातील पैसे लंपास करायचे, अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीचा कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तीन आरोपींना बिहारला पळून जात असताना पटना एक्स्प्रेसमध्ये सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले.

आरोपीच्या अटकेनंतर टोळीचा पर्दाफाश

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील एका एटीएम सेंटरमध्ये नागरिकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी राजेश कुमार यादव याला अटक केली.

Pune Crime News: विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर

राजेशची चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी तीन साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. संबंधित आरोपी भिवंडीतील कोनगाव परिसरात असल्याचे समजल्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने त्यांच्या मागावर रवाना झाले.

बिहारला पळण्याच्या तयारीत होते आरोपी

पोलिसांना आरोपी पटना एक्स्प्रेसने बिहारला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. मात्र पोलीस स्टेशनवर पोहोचेपर्यंत पटना एक्स्प्रेस रवाना झाली होती. पोलिसांनी हार न मानता धावपळ करत ट्रेन गाठली आणि डब्यांमध्ये आरोपींचा शोध सुरू केला. अखेर कसारा रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत हरिराम सिंग, रोहित कुमार सिंग आणि सुदीप कुमार विश्वकर्मा यांना अटक करण्यात आली.

ATMमध्ये फेविक्विक लावून अशी व्हायची फसवणूक

पोलिसांच्या तपासानुसार या टोळीची फसवणुकीची पद्धत धक्कादायक होती. आरोपी एटीएम सेंटरच्या आसपास सावजाच्या प्रतीक्षेत थांबायचे. त्यापूर्वी एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्याच्या स्लॉटमध्ये फेविक्विक लावले जायचे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकाचे कार्ड मशीनमध्ये अडकायचे. कार्ड बाहेर येत नसल्याचे पाहून टोळीतील एक सदस्य मदतीच्या बहाण्याने पुढे यायचा. संबंधित व्यक्तीला वारंवार PIN टाकण्यास सांगितले जायचे. याचवेळी आरोपी PIN पाहण्याचा किंवा अन्य मार्गाने तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे.

बनावट मदतीचा नंबरही टोळीचाच

पैसे न निघाल्यास पीडित नागरिकाला एका मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले जायचे. मात्र हा क्रमांक प्रत्यक्षात टोळीतील दुसऱ्याच सदस्याचा असल्याचे तपासात समोर आले आहे. फोन केल्यानंतर संबंधित नागरिकाला दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगून एटीएमपासून दूर केले जायचे. दरम्यान, मिळवलेल्या PIN किंवा अन्य माहितीचा वापर करून आरोपी पीडिताच्या खात्यातील पैसे काढत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

आणखी किती जणांना गंडा?

या टोळीने याच पद्धतीने आणखी अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपींनी नेमक्या किती एटीएम सेंटरमध्ये असे प्रकार केले, किती नागरिकांना गंडा घातला आणि एकूण किती रक्कम लंपास केली, याचा तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.

या प्रकारामुळे नागरिकांनी ATMमध्ये कार्ड अडकल्यास कोणत्याही अनोळखी व्यक्तीसमोर PIN टाकू नये किंवा PIN सांगू नये, तसेच मशीनवर दिलेल्या अधिकृत बँक हेल्पलाइनशीच संपर्क साधावा, ही खबरदारी महत्त्वाची ठरते.

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

Web Title: Kalyan kolsewadi police arrest atm fevikwik fraud gang from patna express

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • ATM
  • crime
  • kalyan
  • KDMC
  • police

संबंधित बातम्या

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत
1

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश
2

KDMC News: तीन वर्षांपासून कोट्यवधींची देणी थकीत; ‘आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका’, ठेकेदारांचा आक्रोश

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप
3

MPSC पेपरफुटीत अधिकाऱ्याचा मोठा ‘खेळ’? पुतण्यासाठी पेपर फोडल्याचा दावा; प्रेमप्रकरणाचा अँगल देऊन प्रकरण दडपण्याचा आरोप

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.