फोटो सौजन्य सोशल मिडिया
Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्थानकावर एका महिला रेल्वे कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी डेप्युटी स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारल्याची आणि तिथे वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वेस्टेशनवर एका महिला कर्मचारी सोबत एक रेल्वे अधिकाऱ्याने पिढीत महिलेला व्हॅाट्सअप अश्लिल मॅसेज आणि अॅाफिस मध्ये गैर वर्तन केल्या प्रकरणी कल्याण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची पुढील कारवाई पोलिस करणार आहे.
मी कल्याण स्थानकाजवळ काम करते मी एक पॅाईट्समॅन आहे. आमचे डीपीएसएस आहेत ते मला घाणेरड्या नरजरेणे पाहयचे ,
मला गेले 6 महिन्या पासून व्हाॅट्सअप वर अश्लिल मॅसेज करायचे; मी तक्रार देऊन देखिल ते मला त्रास देत होते. मी स्टेशन मास्तर कडे देखिल त्यांची तक्रार दिली होती.
या घटनेची कोणी दखल घेतली नाही; मग मी मनसे कार्यकर्त्यांना या विषयी तक्रार केली. मला मनसे कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. असे पिढीत महिलेने सांगितले आहे.
पीडित महिला कर्मचाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात संबधित रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्टेशन मास्तरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीडित महिलेला गेले 6 महिने त्रास सहन करावा लागत होता. पिढीत महिलेने मनसे रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे मदत मागितली होती. मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात जाऊन डेप्युटी स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि तेथे जोरदार वाद झाला; त्यात झटापट झाली. या मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे डीपीएसएस चांगलाच चोप दिला.
स्टेशन मास्तरला चोप दिल्याने त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. स्टेशन मास्तरला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.पीडित महिला कर्मचाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात संबधित रेल्वे अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोषी स्टेशन मास्तरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.






