कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील ताडवाडी येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माळरानावर असलेल्या घरामध्ये एमडी हे अंमली पदार्थ बनविले जात होते.स्थानिक ग्रामस्थांनी रात्री त्या सर्व पाच जणांना पकडून नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं .दरम्यान या सर्व आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली कारवाई करण्यात आली असून पाच जणांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे,तर घर भाड्याने देणारा स्थानिक आदिवासी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पाथरज ग्रामपंचायतमधील ताडवाडी येथे अंमली पदार्थ एम डी बनविण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी उध्वस्त केला. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलिसांनी अंमली पदार्थ बनविणाऱ्या त्या पाच जणांना पकडून आणले होते. त्या पाच जणांमध्ये मास्टर माईंड असलेला तरुण हा डी फार्मसी आहे.पोलिसांनी पकडलेले तरुण हे चार मुंबई येथील असून एक शहापूर ठाणे येथील आहे.या घटनेची माहिती कर्जत पोलिस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि सहायक पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
या घटनेत कच्चा माल हस्तगत करण्यात आला असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एम डी अंमली पदार्थ बनविणाऱ्या लोकांवर कारवाई केली. पोलीसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १६ लाखांचा कच्चा माल हस्तगत केला .या घटनेतील आरोपींवर भारतीय न्याय संहितानुसार अंमली पदार्थ विरोधीनुसार कारवाई केली आहे.ताडवाडी येथे फॉर्नसिक तज्ज्ञ आणि अमली पदार्थ विरोधी तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.तर सर्व पाच आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर घर मालक हा देखील आरोपी असून सदर आदिवासी व्यक्ती फरार झाला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी याच ग्रामपंचायतमधील किकवी येथील फॉर्म हाउस मध्ये एम डी ड्रग बनविणारा कारखाना उध्वस्त केला होता. त्यामुळ कर्जत शहर हे गर्दुल्यांचा अड्डा होतोय का ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. पोलीसांनी मागच्या वेळेस कारवाई करुनही पुन्हा शहरात अंमली पदार्थ बनविण्याची हिंमत गुन्हेगारांची होतेच कशी ? यांना कायद्याचा धाक नाही की कोणाचं अभय आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.