Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

एसआयटीने जारी केलेल्या ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ या हेल्पलाईन क्रमांकांमुळे पीडितांना पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढण्यापूर्वीच एक सुरक्षित व्यासपीठ मिळाले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 09:37 AM
Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Ashok Kharat Case : खरातने अनेक महिलांवर केले अत्याचार; हेल्पलाईनवर खरातविरोधात तक्रारीच तक्रारी

Follow Us
Follow Us:

नाशिक : स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या भोंदूगिरीचा आणि अत्याचाराचा मुखवटा आता पूर्णपणे फाटला आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुरू केलेल्या हेल्पलाईनमुळे पीडितांसह खरातविरोधात माहिती देणाऱ्यांना सहज सोपे झाले आहे. दररोज ८ ते १० नवे कॉल्स येत असून, खरातच्या ‘काळ्या साम्राज्या’चे धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागत आहेत.

अनेक वर्षांपासून आध्यात्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेला अन्याय आणि अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. एसआयटीने जारी केलेल्या ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ या हेल्पलाईन क्रमांकांमुळे पीडितांना पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढण्यापूर्वीच एक सुरक्षित व्यासपीठ मिळाले आहे. यामुळेच खरातच्या दहशतीखाली वावरणाऱ्या पीडित महिला, फसवणूक झालेले व्यावसायिक आणि पूर्वाश्रमीचे भक्त आता न घाबरता समोर येत आहेत. खरातच्या कामकाजाची पद्धत आणि त्यामागची खळबळजनक रहस्ये या हेल्पलाईनद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचत आहे.

खरातच्या दहशतीमुळे अनेक महिला तक्रार करण्यास धजावत नव्हत्या. मात्र, हेल्पलाईनच्या माध्यमातून पोलिसांनी पुढाकार घेत या महिलांचे समुपदेशन सुरू केले आहे. प्रत्येक कॉलची गांभीर्याने दखल घेऊन पीडितांना धीर दिला जात असल्याने तक्रारदारांचा आकडा आता डझनच्या पार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मध्यस्थांचीही आता खैर नाही

तपासाची चक्रे आता केवळ खरातपुरती मर्यादित नसून, अनेक निष्पाप कुटुंबांना या भोंदूच्या दारात नेऊन सोडणाऱ्या ‘मध्यस्थांची’ ही चौकशी एसआयटीने सुरू केली आहे. सध्या पीडितांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ठोस पुरावे हाती लागताच या रॅकेटमधील मोठ्या माशांवर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

हेदेखील वाचा : Ashok Kharat : ‘तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू’, ‘त्या’ आत्मचरित्रामध्ये अशोक खरातचा उल्लेख; पुस्तकात चमत्कारांचे दाखले

तपासाचा फास अधिक घट्ट

महिलांचे शोषण आणि अवैध संपत्तीच्या आरोपाखाली पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या संशयित आरोपी अशोक खरात विरोधात आता तपासाचा फास अधिक घट्ट झाला आहे. या तपासादरम्यान सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या संघटनेचे (स्टाईस) चेअरमन नामकणं आवारे आणि खरात यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. विशेष म्हणजे खुद्द आवारेंनी लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख ‘सिद्धपुरुष’ आणि ‘गुरू’ असा केल्याने तसेच त्याच्या चमत्काराचे दाखले दिल्याने हे पुस्तक तब्बल १४ वर्षांनी चर्चेत आले आहे.

Web Title: Kharat abused numerous women helpline flooded with complaints against him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
1

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
2

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
3

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
4

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.