तीन आरोपीना पोलिस कोठडी (फोटो- istockphoto)
घंटा चोरीप्रकरणी तिघांना कोठडी
तपासात झाला १६ चोऱ्यांचा उलगडा
आणखी ऐवज चोरीस गेल्याची माहिती
खेड: रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मंदिरातून झालेल्या धातूच्या पितळी घंटा, समई व इतर ऐवज चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या राकेश तुळशीराम पडवकर (लोणावळा), जगलाल केवट (उत्तरप्रदेश), हिरालाल कुम्हार (पनवेल) यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंत ५०० हुन अधिक किलो ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे, चोरीप्रकरणात आणखी काहींच्या सहभागाचा पोलिसांना संशय असून पथके त्यांच्या मागावर आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चिवेक अहिरे यांनी तालुक्यातील शिरगाव खुर्द-शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातील पितळी घंटा चोरीप्रकरणाचा छडा लावला. तिघांच्या अटकेने आतापर्यंत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडा झाला आहे.
आणखी ऐवज चोरीस
अटकेतील राकेश पडवकर आणि जगलाल केवट अट्टल चोरटे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, या दोघांनी मंदिरातून चौरलेल्या घातूच्या पितळी घंटा व अन्य ऐवज हिरालाल गंगारामजी कुम्हार याने घेतल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे. दाट शक्यता आहे. आणखी काहींचा सहभाग असण्याच्या शक्यतेने पथकाने तपास गतीमान केला आहे, या पथकात पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलिस कॉन्स्टेबल अजय कडू वैभव ओहोळ, विजेट सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंके यांचा समावेश आहे.
कशेडीमध्ये अडीच लाखांची दागिने चोरी
खेड तालुक्यातील कशेडी येथील ओझरवाडी येथे भाचीच्या लग्नासाठी आलेल्या बहिणीचे एकूण २,५८, ७३६ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. मंगळवार (दि. ०३) सकाळी १०:३० ते बुधवारी (दि. ०४) सकाळी १०:३० या दरम्यान ही घटना घडली. याबाब वैशाली विनायक सुर्वे (क्य ५२, रा. महसळा जि. रायगड, सध्या कासार चाळ, मालपा डोंगरी, अंधेरी पूर्व मुंबई) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चोरटयाचा तपास सुरू आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






