Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: कोल्हापूर पोलिसांची कामगिरी दमदार! 20 महिन्यांपासून फरार असलेल्या ‘त्या’ कुख्यात आरोपीला अटक

आरोपी नेर्लेकर याने अनेक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न देता त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 13, 2025 | 09:36 PM
Crime News: कोल्हापूर पोलिसांची कामगिरी दमदार! 20 महिन्यांपासून फरार असलेल्या 'त्या' कुख्यात आरोपीला अटक

Crime News: कोल्हापूर पोलिसांची कामगिरी दमदार! 20 महिन्यांपासून फरार असलेल्या 'त्या' कुख्यात आरोपीला अटक

Follow Us
Follow Us:
कोल्हापूर: गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असलेला राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४८, रा. शिवाजीनगर, हुपरी) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. जानेवारी २०२४ पासून तो पसार होता. इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केल असता त्याला पोलिस कोठडी मिळाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नेर्लेकर याने अनेक गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र ठरलेल्या मुदतीत परतावा न देता त्याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्याच्याविरोधात इचलकरंजी सह विविध  पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.

 गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले होते. पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.

विविध प्रकारचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नेर्लेकर याच्यावर हुपरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आंध्रप्रदेशातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याला अटकही केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्यावर हुपरी पोलिस   ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Pune Crime: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू; कुटुंबीयांचा ‘रॅगिंग’चा गंभीर आरोप

जैन मुनींचीही फसवणूक 
हुपरीतील एका जैन मुनींचीही त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली होती. याबाबत मुनींसह गुंतवणूकदारांनी नेर्लेकर याच्या घरासमोर उपोषण केले होते. त्यानंतर अटकेच्या भीतीने नेर्लेकर पसार झाला होता. जानेवारी २०२४ मध्ये त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची फिर्याद हुपरी पोलिस ठाण्यात दिली होती. अखेर २० महिन्यांनी त्याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले.
फसवणुकीची व्याप्ती वाढली
 नेर्लेकर याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. हुपरी पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आलेल्या तक्रार अर्जांनुसार १९ कोटींची फसवणूक Shorts झाल्याचे स्पष्ट झाले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
 या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांकडून त्याच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असून, आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा शोध घेतला जात आहे. आरोपीकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे

Web Title: Kolhapur police arrested rajendra nerlekar in fraud case crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 09:31 PM

Topics:  

  • crime news
  • fraud
  • Kolhapur Police

संबंधित बातम्या

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
1

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले
2

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं
3

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी
4

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.