कल्याण: ऑनलाईन पैसे देतो असं सांगून सुपर मार्केटच्या दुकानदारांना गंडा घालणाऱ्या चोरांना पोलीसांनी अटक केली आहे. महागाई आणि त्यामुळे वाढत जाणारी बेरोजगारी यासगळ्याने गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं चित्र समोर येत आहे. ठाण्यात राहणारे सराईत गुन्हेगार सुपर मार्केट गाठून त्याठिकाणी किराणा खरेदी करायचे आणि दुकानदाराने बिलाची विचारणा केली असता एका फोन पे वरुन पैसे पाठवितो असे सांगायचे. या दोघांनाही कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पंकज गोपाळ पाटील आणि अनिल अरुण कांबळे अशी आहे. या दोघांकडून पोलिसांनी मुद्दमाल हस्तगत केला आहे.
कल्याण पूर्वेतील आर. के. बझार या सुपर मार्केटमध्ये पंकज पाटील आणि अनिल कांबळे गेले. त्यांनी किराणा मालाची खरेदी केली. बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी दुकानदाराला फोन पे वर पैसे देतो. आ’नलाईन पेमेंट करतो असे सांगिलले. हे दोघेही बनावट फोन पे दाखवून खरेदी केलेल्या किराणा मालाचे बिल पेड करीत नव्हते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सिराज शेख आणि सहाय्यक पाेलिस निरिक्षक दर्शन पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत आरोपीना बेड्या ठोकल्या आहे. अशा प्रकारे या दोन्ही आरोपीनी मानपाडा पोलिस ठाण्यात सुपर मार्केट दुकानदाराची फसवणू केली होती. या दोन्ही गुन्ह्यात खरेदी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारे या दोन्ही आरोपींनी अन्य किती सुपर मार्केट दुकानदारांना चुना लावला आहे या अंगाने पोलिस पुढील तपास करीत आहेत.