Air India Flight Security Threat : सोमवारी मुंबईहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली. मुंबईहून न्यू यॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान (एआय ११९) संभाव्य सुरक्षेच्या धोक्यामुळे मुंबईत परतले. सकाळी १०:२५ वाजता विमान सुरक्षितपणे उतरले. प्रवाशांना एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मंगळवारी सकाळी ५ वाजता विमानाचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना राहण्याची, जेवणाची आणि आवश्यक ती मदत पुरवण्यात आली आहे. ३२० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सुरक्षा एजन्सींकडून याची सक्तीने चौकशी केली जात आहे. यावेळी विमानतळावर गोंधळ उडाला.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आज, १० मार्च २०२५ रोजी, एआय ११९ मुंबई-न्यू यॉर्क (जेएफके) च्या उड्डाणादरम्यान संभाव्य सुरक्षा धोका आढळून आला. आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, विमानातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या हितासाठी विमान परत मुंबईकडे वळवण्यात आले.”
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्कला जाणाऱ्या विमानाला धमकी मिळाली होती, त्यानंतर ते मुंबईत परत उतरवण्यात आले. सुरक्षा संस्थांनी विमानाची सक्तीची तपासणी सुरू केली. एअर इंडियाने सखोल चौकशी सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाचे वेळापत्रक बदलून ते मंगळवार, ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता निघेल. दरम्यान, सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर आवश्यक मदत पुरवण्यात आल्याचे एअरलाइनने सांगितले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘आज, १० मार्च रोजी मुंबई-न्यू यॉर्क (जेएफके) उड्डाण करणाऱ्या एआय११९ विमानात उड्डाणादरम्यान संभाव्य सुरक्षा धोका आढळून आला. आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, विमानातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान मुंबईला परतले. ‘आमच्या प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आमचे पथक जमिनीवर काम करत आहेत. नेहमीप्रमाणे, एअर इंडिया प्रवाशांच्या आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते.
एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, भारतीय वेळेनुसार सकाळी १०:२५ वाजता विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले. सुरक्षा एजन्सींकडून विमानाची सक्तीची तपासणी केली जात आहे. आम्ही एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना आमचे पूर्ण सहकार्य देत आहोत. उड्डाणांच्या वेळा बदलल्या आहेत. आता ११ मार्च रोजी सकाळी ५ वाजता विमान उड्डाण करेल.
प्रवाशांसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे: तोपर्यंत सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, जेवण आणि इतर मदत देण्यात आली असल्याचे एअरलाइनने सांगितले. बोईंग ७७७-३०० ईआर विमानात १९ क्रू मेंबर्ससह ३२२ लोक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानात बॉम्ब असण्याची धमकी होती. विमानातील शौचालयात एक चिठ्ठी सापडली.