४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन
तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील सिंनगाव जहाँगीर आणि खल्याळ गव्हाण परिसरात जिल्हाधिकारी विशेष पथकाव्दारे अवैध रेती उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून संबधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच दिवशी ३० अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विनानंबर टिपरविरुद्ध ६.५० लाखांची दंडात्मक कारवाई केली होती. नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८९७ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून संबंधित ११० वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, परिवहन, पोलिस व अन्य विभागाच्या संयुक्त कारवाई केली. यात जिल्ह्यात १ एप्रिल ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात ८९७ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ४१४ प्रकरणे अवैध उत्खनन, वाहतूक संबंधित आहेत. ४८३ विना क्रमांकाच्या वाहनांवर कारवाई केली, तर ११० प्रकरणांत गुनो दाखल केले आहेत, या सर्व कार्यवाहीमधून जिल्हा प्रशासनाने एकूण ४ कोटी ८७ लाख रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे.
अवैध आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा महूसल, परिवहन, पोलीस व अन्य विभागाचे तालुकास्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत, ही पचके गौण खनिजाबी वाहतूक करणाऱ्या कहनांबी नियमित तपासणी करत आहेत. रॉयल्टी पासेस किया वाहतूक पासेस नसलेल्या वाहनांवर शासन नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना परिसरात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याचे आढळल्यास, त्यानी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किवा पोलीस विभागास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.






