• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Kudal In Atm Broke And Twelve Lakhs In Cash Seized Then

भल्या पहाटे चोरट्यांनी ATM फोडले, बारा लाखांची रोकड हस्तगत

खरेदी-विक्री संघाच्या साधना बाजार जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. त्यानंतर १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी २ चोरट्यांना रंगेहाथ पकडले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2024 | 05:16 PM
भल्या पहाटे चोरट्यांनी ATM फोडले, बारा लाखांची रोकड हस्तगत

भल्या पहाटे चोरट्यांनी ATM फोडले, बारा लाखांची रोकड हस्तगत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुडाळ शहरातील खरेदी-विक्री संघ येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमधील १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी २ चोरट्यांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, यामधील एका आरोपीने पळ काढला. मात्र, हा आरोपी पणदूर येथे पोलिसांच्या हाती लागला तर अजून दोन आरोपींनी गाडीतून पळ काढला. ते अद्याप सापडून आलेले नाहीत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिली.

यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अनिल अम्मिलाल बलोदा (२५, रायला थाना पिलानी, ता. सुरजगड, जि. झुनझुन, राजस्थान) आणि वारीस जफरुद्दीन खान (२६, विलासपूर, ता. तिजारा, जि. अलवर, राजस्थान) अशी असून फरारीमध्ये समशाद खान (पूर्ण माहिती नाही, सध्या : पनवेल, मूळ : उत्तरप्रदेश आणि राजू आंबेकर (विलेपार्ले, मुंबई) यांचा समावेश आहे. तसेच पळून गेलेल्या दोन आरोपींकडे मारुती झेन ऍस्टिलो (एम एच ०२ सी एच ८०८५) हे वाहन आहे.

कुडाळ येथील खरेदी-विक्री संघाच्या परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. हे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न उघड झाला. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी-विक्री संघाच्या साधना बाजार जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाल करीत असल्याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली.

त्याबरोबर राखीव असलेले पोलीस ममता जाधव, शांताराम वराडकर, रिडन बुथेलो, चिंदरकर हे एटीएमच्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्या ठिकाणी एटीएम मशीनच्या गाळ्यामध्ये कोणीतरी आतमध्ये काहीतरी करत असल्याचा आवाज येत होता. या गाळ्याचे शटर बंद होते. राखीव पोलिसांनी सावधगिरी बाळगत आवाज दिला. त्याबरोबर एटीएम मशीन फोडून त्यामधील रोख रक्कम असलेले बॉक्स बाहेर काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी या आरोपींवर झडप घातली.

यामधील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला तर दुसरा आरोपी रोख रक्कम असलेला एक बॉक्स घेऊन हिंदू कॉलनीच्या दिशेने पळाला. त्याचा पाठलाग करण्यात आला. मात्र, तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर राखीव पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर, संजय कदम, रुपेश सारंग, कृष्णा केसरकर, अमोल महाडिक तसेच इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि पळ काढलेल्या चोराच्या मागावर गेले.

पणदूर येथे सापडला दुसरा चोर

रोख रक्कमेचा बॉक्स घेऊन पळालेला चोर पणदूर येथे सापडला. हा चोर हिंदू कॉलनी मार्गे महामार्गावर गेला. त्यांनतर पावशी या ठिकाणी कोणाची तरी सायकल घेऊन कॅरिअरला रोख रकमेचा बॉक्स टी-शर्टाने बांधून तो ओरोसच्या दिशेने जात असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना तो महामार्गावर दिसून आला. त्याची चौकशी केली असता त्याने सायकल व तो रोख रकमेचा बॉक्स टाकून जवळच असलेल्या हातेरीवरून येणाऱ्या पावशी येथील नदीमध्ये उडी घेतली आणि पुन्हा तो पळाला. दरम्यान, सर्व पोलीस यंत्रणेला याबाबतची माहिती देण्यात आली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यामध्ये सामील झाली. पणदूर येथे पोलीस यंत्रणा दाखल झाल्यावर त्या ठिकाणी एका दुकानांमध्ये वडापाव खात असताना हा आरोपी पोलिसांनी पकडला.

दोन आरोपी पळाले

ही चोरी करण्यासाठी चार जण आले होते. दोन आरोपी एटीएम मशीनच्या ठिकाणी तर दोन आरोपी कारमध्ये होते. ही कार एटीएमच्या समोर उभी करून ठेवण्यात आली होती. या आरोपींना पकडताच कारमधील दोन्ही आरोपीने कारसह पलायन केले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान या चोरीमध्ये सुमारे १२ लाख ६५ हजार ९०० रुपये रक्कम मिळाली आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गावडे यांनी नोटांची तपासणी केली.

दिल्लीवरून आला अलर्ट

या चोरट्याने सर्व सावधगिरी बाळगली एटीएम मशीनच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कट केल्या. त्यानंतर गॅस कटरणे मशीन कापली आणि चोरी करायला सुरुवात केली. ही चोरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास सुरू केली. दरम्यान, एटीएम मशीनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी दिल्ली येथे झाली. दिल्ली येथील कर्मचाऱ्यांनी मुंबई व नंतर कुडाळ येथे एटीएम मशीनच्या खोलीमध्ये काहीतरी वेगळ्या हरकती दिसत असल्याचे पोलीस यंत्रणेला कळवले. ही माहिती समजल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे राखीव असलेले चार पोलीस कर्मचारी एटीएमच्या ठिकाणी दाखल झाले आणि ही चोरी उघड झाली. यात मुद्देमाल आणि चोरही रंगेहाथ सापडले.

Web Title: Kudal in atm broke and twelve lakhs in cash seized then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • Kudal

संबंधित बातम्या

Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?
1

Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?

वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडोली रस्ता खड्डेमय, नागरिकांचे हाल, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
2

वेतोरे सबस्टेज ते आदोसेवाडी तेंडोली रस्ता खड्डेमय, नागरिकांचे हाल, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

SINDHURUG : कुडाळ-मठ रस्त्यावरील वीजवाहिनी काम थांबवले; कार्यकारी संचालक यांचा आरोप
3

SINDHURUG : कुडाळ-मठ रस्त्यावरील वीजवाहिनी काम थांबवले; कार्यकारी संचालक यांचा आरोप

Sindhudurg : कुडाळ आगाराच्या नवीन ५ गाड्यांचे, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
4

Sindhudurg : कुडाळ आगाराच्या नवीन ५ गाड्यांचे, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चांदी खरेदी, ATM आणि FD नियमांमध्ये १ सप्टेंबरपासून मोठा बदल, सामान्यांच्या खिशावर काय होईल परिणाम? जाणून घ्या

चांदी खरेदी, ATM आणि FD नियमांमध्ये १ सप्टेंबरपासून मोठा बदल, सामान्यांच्या खिशावर काय होईल परिणाम? जाणून घ्या

Shani Mangal दृष्टीमुळे 3 राशींवर पडणार नकारात्मक प्रभाव, 13 सप्टेंबरपर्यंत सावध राहण्याचा इशारा

Shani Mangal दृष्टीमुळे 3 राशींवर पडणार नकारात्मक प्रभाव, 13 सप्टेंबरपर्यंत सावध राहण्याचा इशारा

Palghar : एक गाव, एक गणपती , उर्से गावाची 53 वर्षांची परंपरा

Palghar : एक गाव, एक गणपती , उर्से गावाची 53 वर्षांची परंपरा

BPSC भरतीसाठी अर्ज करा! अधिक माहितीसाठी नक्की वाचा

BPSC भरतीसाठी अर्ज करा! अधिक माहितीसाठी नक्की वाचा

राज्यातील ‘या’ शहरात घेण्यात आला डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय; लेझर लाईटही नाहीच

राज्यातील ‘या’ शहरात घेण्यात आला डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय; लेझर लाईटही नाहीच

Dhule Crime: साधूचा वेष घेऊन रस्त्यावर लूट, उत्तराखंडातील पाच दरोडेखोर धुळे पोलिसांच्या जाळ्यात

Dhule Crime: साधूचा वेष घेऊन रस्त्यावर लूट, उत्तराखंडातील पाच दरोडेखोर धुळे पोलिसांच्या जाळ्यात

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न;पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

Kolhapur : महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न;पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट

Sangli : आंदोलनानंतर माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

Sangli : आंदोलनानंतर माजी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

Satara : ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी शिवतीर्थ दणाणले

Satara : ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी शिवतीर्थ दणाणले

Wardha : वर्धात आगळीवेगळी हरतालिका साजरी, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गौरी पूजन

Wardha : वर्धात आगळीवेगळी हरतालिका साजरी, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गौरी पूजन

Thane : ऑर्डनन्सच्या इंटक युनियन अध्यक्षपदी प्रदीप पाटील, युनियनच्या कार्यकारिणीचीही घोषणा

Thane : ऑर्डनन्सच्या इंटक युनियन अध्यक्षपदी प्रदीप पाटील, युनियनच्या कार्यकारिणीचीही घोषणा

Mumbai : मनसेने मूषकराज बनून केला गणपती बाप्पांना फोन मीरा-भाईंदरला येऊ नका दिला संदेश

Mumbai : मनसेने मूषकराज बनून केला गणपती बाप्पांना फोन मीरा-भाईंदरला येऊ नका दिला संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.