बास्केटबॉलचा खांब छातीवर पडल्याने खेळाडूचा मृत्यू(फोटो-सोशल मीडिया)
Death of Rohtak basketball player: हरियाणातील रोहतक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १७ वर्षीय राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू हार्दिक राठीचा मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. लखनमजरा गावात मैदानावर हार्दिक राठी सराव करत होता. या दरम्यान बास्केटबॉलचा खांब अचानक तुटला आणि त्याच्या छातीवर जाऊन पडला. यामध्ये हार्दिक राठी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test : सुपरमॅन मार्को जॅन्सन पाहिलात का? आश्चर्यकारक झेल घेऊन लावले वेड; पहा व्हिडिओ
हार्दिक राठीने तीन सब-ज्युनियर राष्ट्रीय आणि एका युवा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याची बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या इंदूर अकादमीसाठी देखील निवड झाली होती. तो अनेकदा प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहत होता, आता अलीकडेच, तो त्याच्या गावात जमिनीवर सराव करत असायचा.
मंगळवारी सकाळी १०:३० च्या सुमारास हा अपघात घडला. हार्दिक सराव करत असताना होता. इतर संघातील खेळाडू त्याच्या जवळच बसून विश्रांती घेत असताना तो उडी मारत असताना, अचानक बास्केटबॉलचा खांब तुटला आणि हार्दिकच्या छातीवर आदळला. टीममेट्सनी तात्काळ पोल काढून त्याला रुग्णालयात नेले, परंतु, त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
राष्ट्रीय स्तर के युवा बास्केट बॉल खिलाड़ी हार्दिक राठी की असमय मौत से प्रदेश में शोक की लहर छा गई है। युवा खिलाड़ी को श्रद्धांजलि देते हुए ओलंपिक संघ ने निर्णय लिया है कि हरियाणा में अगले तीन तक दिन किसी भी प्रकार का खेल उत्सव का आयोजन न किया जाएगा। pic.twitter.com/7ZxHWmQzt7 — नीरज तिवारी 🇮🇳 Neeraj Tiwari (@OMG_neeraj) November 25, 2025
हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हार्दिक सराव करताना आणि नंतर अचानक उडी मारताना पोल पडताना दिसून येत आहे. पोल पडताच सहकारी खेळाडू घटनास्थळी धावून येताना दिसत आहेत. हार्दिकला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा आधीच मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच, लखनमजरा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबाच्या जबाबाच्या आधारे, त्वरित कारवाई करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द केला. हार्दिक हा संदीप यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा होता. तो कुटुंबाची आशा होता, राष्ट्रीय पातळीवर सातत्याने असाधारण कामगिरी करत असणाऱ्या हार्दिकच्या अकाली मृत्यूमुळे गाव आणि क्रीडा जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेच्या या अनुषंगाने, ऑलिंपिक असोसिएशनने राज्यात तीन दिवस कोणत्याही क्रीडा स्पर्धा पार पडणार नाहीत. अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, क्रीडा जगतात, सोशल मीडियासह, हार्दिक राठीच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे यावर आता प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत.






