शरद पवारांना रामराम; बळीरामकाका साठे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
गेली साठ वर्षांपासून देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून राजकीय सहा दशकांचा राजकीय प्रवास केलेले काका साठे यांना विश्वासात न घेता चार महिन्यांपूर्वी त्यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून घेतले. तेव्हापासून साठे अस्वस्थ होते. आता खा.शरद पवार यांच्या पक्षात राहणे नाही, असे जाहीर केल्यानंतर त्यांना भाजपात येण्यासाठी आमदार सुभाष देशमुख, शिवसेनेत (एकनाथ शिंदे) येण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा अध्यक्ष अमोलबापू शिंदे यांनी आग्रह धरला होता. मात्र, बहुतांशी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले बरे, असा सल्ला दिला.
लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट
अशातच तीन आठवड्यापूर्वी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वडाळा येथे येऊन काका साठे यांची भेट घेऊन अजितदादांच्या पक्षात येणे कसे योग्य राहील, यावर एक तास चर्चा केली. थेट अजित पवार यांच्याशी बोलणे करुन दिले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी काका साठे हे अजित पवार यांना नातू जयदीप साठे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले असता मी तुमच्या सोबत असल्याचे साठे यांनी सांगितले. मात्र, अधिकृत प्रवेश कधी, याकडे सा-या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून गुरुवारी (दि.27) सकाळी दहा वाजता अजित पवार वडाळा येथे येणार आहेत.
यावेळी वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात साठे यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, काका साठे यांचे नातू जयदीप साठे उपसरपंच अनिल माळी, प्रल्हाद काशीद, मार्डीचे उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, शशिकांत मार्तंडे, प्रशांत काशीद, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित राहणार आहेत.
भारतातील हे YouTubers अक्षरशः पैशांच्या थारोळ्यात लोळतायत! एकाची महिन्याची कमाई तब्बल 2.5 ते 3 कोटी
१९६४ ते १९८९ पर्यंत २५ वर्षे वडाळा गावचे सरपंच होते. १९७९ ते २०२२ पर्यंत (1998 व 2003 चा अपवाद वगळता ) जिल्हा परिषद सदस्य व कृषी शुसंवर्धन समिती सभापती. १९९३ ते १९९४ पर्यंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अर्थ व बांधकाम समिती सभापती पुन्हा सन २००८ ते २०१७ पर्यंत जिल्हा परिषद सदस्य सन २००९ ते २०१२ पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन २०१८ ते २०२२ पर्यंत जिल्हा परिषदेचे सदस्य, कृषी समितीचे सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष, विरोधी पक्षनेते या पदांवर कार्यरत होते. कृषी समिती सभापती असताना शेतकऱ्यांना शेतीची अवजारे देण्याची योजना सुरू केली. त्यावेळी राज्य शासनाने सोलापूर जिल्हा परिषदेचा अवजारे वाटपाचा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून संपूर्ण राज्यात लागू केला.
१९९३ साली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना किल्लारी भूकंपग्रस्त भागात मदत कार्यासाठी जिल्हा परिषदेचे पथक घेऊन पहिल्यांदा दाखल झाले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत शासनाची प्रत्येक योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला. सोलापूर जिल्ह्यातील एक वजनदार नेता ना.अजित पवार यांना मिळाल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्र्वादी आणखी मजबूत होईल,हे स्पष्ट आहे.






