Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: हृदयद्रावक घटना! दोन चुलत भाऊ बेपत्ता; एक मृत, दुसऱ्याचा थांगपत्ता नाही

लातूरच्या चाकूर तालुक्यात दोन चुलत भाऊ बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. काही तासांत 6 वर्षीय देवांशचा मृतदेह घराजवळ सापडला, तर 11 वर्षीय साईचरण अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांनी 10 पथके तयार करून तपास आणि शोधमोहीम सुरू केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 09:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चाकूरमध्ये दोन चुलत भाऊ अचानक बेपत्ता
  • 6 वर्षीय देवांशचा मृतदेह घराजवळ आढळला
  • 11 वर्षीय मुलाचा शोध सुरू; तपासासाठी 10 पथके कार्यरत
लातूर: लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वामी कुटुंबातील दोन चुलत भाऊ रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले होते. काही तासांनी सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला तर ११ वर्षीय साईचरण हा अद्याप बेपत्ता आहे. ही घटना चाकूर तालुक्यातील आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

देवांशी मंगेश स्वामी आणि साईचरण दिनेश स्वामी असे बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. हे दोघे सकाळी ७च्या सुमारास बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठेच सापडले नाही. कुटुंबीयांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावात आणि परिसरात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. त्यादरम्यान काही तासांनी सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडून आला. त्याचा मृतदेह घरापासून अवघ्या ६० फुटांच्या अंतरावर आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Amravati Crime: मानवतेला काळिमा! ‘परतवाड्याला सोडतो’ म्हणत गाडीवर बसवले; 65 वर्षीय महिलेला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार

अद्याप साईचरण बेपत्ता

अद्याप ११ वर्षीय साईचरण हा बेपत्ता आहे. याचा देखील शोध पोलीस करत आहे. ही मुले नेमकी कश्यामुळे बेपत्ता झाली, देवंशाची हत्या का करण्यात आली, साईचरण कुठे आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधात आहे. पोलीस तपासनंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतदेह चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होईल. घटनेची माहिती पसरताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती.

पोलिसांनी काय दिली माहिती?

याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, “घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास दहा पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.”

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात.

  • Que: किती मुलं बेपत्ता झाली होती?

    Ans: दोन मुलं बेपत्ता झाली होती, त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 10 पथके तयार करून तपास आणि बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Latur crime heartbreaking incident two cousins go missing one found dead the other still untraced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
3

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.