Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

556 गुन्हे दाखल, 97 लाखांचा मुद्देमाल जप्त; लातूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंदेविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 12:39 PM
556 गुन्हे दाखल, 97 लाखांचा मुद्देमाल जप्त; लातूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई

556 गुन्हे दाखल, 97 लाखांचा मुद्देमाल जप्त; लातूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंदेविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ०१ मे ते ३१ मे या कालावधीत जिल्हा पोलीस दलाने विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करत एकूण ५५६ गुन्हे दाखल केले असून, सुमारे ९७ लाख १४ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ३३४ गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात आली. या कारवाईत २४ लाख ९० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुगार अड्ड्यांवर कारवाई करत १९० गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४३ लाख ७७ हजार ५७५ रुपयांची रोकड व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सट्टा, गुटखा, ड्रग्जवर कारवाई

ऑनलाईन आणि ऑफलाईन क्रिकेट सट्टा चालविणाऱ्यांविरुद्ध देखील जिल्हा पोलीस दलाने कठोर भूमिका घेत १ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, ७ लाख ६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू पदार्थांच्या विक्रीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत ५ गुन्हे दाखल करून ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १३ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातही जिल्हा पोलीस दलाने कठोर कारवाई करत एनडीपीएस कायद्यान्वये १ गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असून, ७ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत कलम १२२ अन्वये २ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच विविध गुन्ह्यांतील ३ फरार आरोपी आणि २० पाहिजे आरोपींना शोधून ताब्यात घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : लातूर विमानतळ विकासासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार अभिमन्यू पवारांच्या पाठपुराव्याला अखेर यश

मोहीम अधिक तीव्र होणार

लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, मादक पदार्थांचा व्यापार, जुगार, सट्टा तसेच सार्वजनिक आरोग्य व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Latur police has taken major action against illegal businesses in a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur Crime

संबंधित बातम्या

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात
1

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक
2

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक

धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला
3

धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त
4

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.