Encounter म्हणजे काय? पोलिसांना कधी परवानगी मिळते? वाचा सविस्तर....
एन्काउंटर हा शब्द पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील संघर्षासाठी वापरला जातो. एन्काउंटर भारतात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तथापि, बनावट चकमकींच्या वाढत्या संख्येमुळे पोलिसांची जबाबदारी, मानवी हक्क आणि कायदेशीर सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. अनेक चकमकींमध्ये पोलिसांना शिक्षाही झाली आहे. एन्काऊंटर म्हणजे नेमके काय? याची सुरूवात कधी झाली? याबाबत कायदा काय म्हणतो? हा शब्द अनेकदा वापरला जातो. जाणून घेऊयात एन्काऊंटर बद्दल…
एन्काउंटर म्हणजे काय?
हॉलिवूड चित्रपटांमध्येही एन्काउंटर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. जेव्हा एखादा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पोलिसांसाठी चकमकीची परिस्थिती निर्माण होते. जेव्हा पोलिस एखाद्या गुन्हेगाराला पकडायला जातात आणि तो पळून जाण्यासाठी प्रयत्न करतो किंवा जेव्हा एखादा गुन्हेगार पोलिसांवर हल्ला करतो आणि पोलिस स्वसंरक्षणार्थ गोळीबार करतात. सामान्यतः, पोलिस प्रथम गुन्हेगाराला चेतावणी देतात, नंतर हवेत गोळीबार करतात. जर गुन्हेगार थांबला नाही आणि धावत राहिला तर त्याच्या पायात गोळी मारली जाते. त्यानंतरही परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर पोलीस गुन्हेगाराच्या शरीराच्या इतर भागांवर गोळीबार करतात.
भारतीय घटनेत एन्काऊंटर शब्दाचा उल्लेख नाही. हा शब्द पोलिसांच्या डिक्शनरीतून आला आहे. साधारणपणे गुन्हेगार, दहशतवादी यांच्यासोबत पोलिसांशी होणाऱ्या चकमकीला एन्काऊंटर म्हटले जाते. एन्काऊंटरला भारतीय घटनेत कोणतेही स्थान नाही. मात्र काही असे नियम आहेत ज्यामुळे पोलिसांना अधिकार मिळतात आणि ते गुन्हेगारांवर गोळीबार करू शकतात. अशा पद्धतीने जर गुन्हेगाराचा मृत्यू झाला तर त्याला योग्य ठरवले जाते.
सीआरपीसी कलम ४६ नुसार एखादा आरोपी अटक होण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पोलिसांवर हल्ला करत असेल तर पोलिसांना त्यावर कारवाई करू शकते. एन्काऊंटरमध्ये होणाऱ्या हत्येला ज्युडिशिअली किलिंग असे देखील म्हटले जाते. भारतीय घटनेच्या १४१ अनुच्छेदानुसार एन्काऊंटरमध्ये विशिष्ठ नियमांचे पालन झाले पाहिजे.
२०१५ साली सर्वोच्च न्यायालयाने पोलीस एन्काऊंटर संबंधी काही सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. एन्काऊंटरची न्यायालयीन चौकशी केली जाते. एन्काऊंटरमध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना चौकशी संपेपर्यंत बढती किंवा पुरस्कार मिळत नाहीत. पोलिसांना प्रत्येक एन्काऊंटरनंतर त्यामध्ये वापरण्यात आलेल्या गोळ्यांचा हिशोब द्यावा लागतो. जर योग्य नियमांचे पालन करून एन्काऊंटर झाला नसेल तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाते.
९० च्या दशकात आणि २००० सालच्या आधी मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डच्या अनेक आरोपींना एन्काऊंटरमध्ये ठार मारले होते. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात एन्काऊंटर झाले आहेत.