सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.
गुंड टीपू पठाण टोळीतील सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अट्टी शेखच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, त्याच्याशी संबंधित तब्बल ६० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याने पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर पिस्तूल रोखण्यापुर्वी पत्नी नसिफा हिने पोलिसांना धक्काबुक्की करत पतीला वाचविण्याचा तसेच त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.