Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia News: गोंदियात बिबट्याचा धुमाकूळ! चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून ठार, जंगलव्याप्त गावांमध्ये दहशतीचे वातावरण

गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही मुलीचा बळी गेला होता. जंगलालगतच्या गावांत बिबट्याची दहशत असून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 10, 2026 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तिरोडा तालुक्यात बिबट्याचा वाढता संचार
  • खडकी डोंगरगावात 4 वर्षीय हियांशचा मृत्यू
  • अनेक गावांत वन्यप्राण्यांची दहशत
  • वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी
गोंदिया: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. तिरोडा तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव येथे शुक्रवारी (दि.९) बिबट्याच्या हल्ल्यात चार वषीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Washim Crime: ‘छाया मोहन’ नाव गोंदलेली, डोकं ठेचलेलं, कपडे फाटलेल्या अवस्थेत…; वाशिम रेल्वे स्टेशनजवळ आढळला महिलेचा मृतदेह

दरम्यान, गावांत आक्रोश कायम असून, दहश्तीचे वातावरण पसरले आहे. आ. विजय रहांगडाले यांनी गावात भेट देवून मृतक मुलांच्या आई वडिलांचे सांत्वन केले. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याचीही मागणी रेटून धरली. हियांश शिवशंकर रहांगडाले असे मृत चिमुकल्याचे नाव असून, तो आपल्या आई वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पसार झाला. चिमुकल्याला ठार केल्यानंतरबिबट्या जंगलात पळून गेला. घटनेतील मृतक चिमुकला हियांश याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना आढळून आला.

दुसऱ्या एका घटनेत गेल्या काही दिवसांपूर्वी याच तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे रूची पारधी नामक मुलगी तिच्या वडिलांसोबत शेतात गेली होती. दरम्यान, बिबट्याने मुलीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या मुलीला गोंदिया येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यता आले होते. तिथे उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत मुलीचे वडील शेतात गेले होते आणि त्यांची मुलगी रूची त्यांच्यासोबत शेतात उभी होती. दरम्यान, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. रूचीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील आणि जवळच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांच्याकडे धावले. त्यानंतर बिबट्या रूचीला सोडून जंगलाकडे पळाला. तेव्हापासून तिरोड्याच्या इंदोरा निमगाव आणि सुकडी डाकराम या परिसरात वन्य प्राण्यांची दहशत आहे.

जंगलव्याप्त गावात दहशत

तिरोडा तालुक्यातील सुकडी डाकराम, पिंडकेपार, खडकी, डोगरगाव, खमारी, बालापवूर, आलेझरी, बेरडीपार, खुशीपार या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. पिंडकेपार गावात प्रवेश करून बिबट्याने राजू शेंडे यांच्या गायीची शिकार केली. तर वासराला जखमी केले, राजू शेंडे हे गोठ्यात म्हशीला सोडण्यासाठी गेले असता, ही बाब उघडकीस आली होती, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी याबाबतची माहिती पिंडकेपार, बोदलकसा बिटाचे वनरक्षक पटले यांना माहिती दिली. वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मागील तीन ते चार दिवसांपासून पिडकार येथे गावात बिबट्याचे दशन होत आहे. याची माहिती वनविभागला देण्यात आली होती. परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वन विभागाने याची दखल घेवून त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Kolhapur Crime: नवविवाहितेचा गळफास, दुसरीने पेटवून घेतला जीव; कोल्हापुरात सासरच्या छळाच्या दोन धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात.

  • Que: मृत मुलाचे नाव काय?

    Ans: हियांश शिवशंकर रहांगडाले.

  • Que: नागरिकांची मागणी काय आहे?

    Ans: बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त आणि सुरक्षा उपाय.

Web Title: Leopard wreaks havoc in gondia attacks and kills a four year old child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • Gondia Crime
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Washim Crime: ‘छाया मोहन’ नाव गोंदलेली, डोकं ठेचलेलं, कपडे फाटलेल्या अवस्थेत…; वाशिम रेल्वे स्टेशनजवळ आढळला महिलेचा मृतदेह
1

Washim Crime: ‘छाया मोहन’ नाव गोंदलेली, डोकं ठेचलेलं, कपडे फाटलेल्या अवस्थेत…; वाशिम रेल्वे स्टेशनजवळ आढळला महिलेचा मृतदेह

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
2

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Kolhapur Crime: नवविवाहितेचा गळफास, दुसरीने पेटवून घेतला जीव; कोल्हापुरात सासरच्या छळाच्या दोन धक्कादायक घटना
3

Kolhapur Crime: नवविवाहितेचा गळफास, दुसरीने पेटवून घेतला जीव; कोल्हापुरात सासरच्या छळाच्या दोन धक्कादायक घटना

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास
4

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.