Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवाई दलाचा गणवेश मिळविण्याचा प्रयत्न; सलूनमध्ये काम करणाऱ्या एकाला ठोकल्या बेड्या

सलूनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने हवाई दलातील मृत जवानाचे बनावट ओळखपत्र दाखवून हवाई दलाचा गणवेश शिवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2026 | 12:30 AM
हवाई दलाचा गणवेश मिळविण्याचा प्रयत्न; सलूनमध्ये काम करणाऱ्या एकाला ठोकल्या बेड्या

हवाई दलाचा गणवेश मिळविण्याचा प्रयत्न; सलूनमध्ये काम करणाऱ्या एकाला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : सलूनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने हवाई दलातील मृत जवानाचे बनावट ओळखपत्र दाखवून हवाई दलाचा गणवेश शिवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शुभम विलास अंबुरे (वय २६, रा. शिक्रापूर रस्ता, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना ६ जुलै रोजी लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील एका टेलरच्या दुकानात उघडकीस आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबुरे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून गेल्या तीन महिन्यांपासून शिक्रापूर येथील एका सलूनमध्ये काम करत आहे. त्याने हवाई दलातील मृत जवान रजत कुमार मिश्रा यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र तयार केले होते. नंतर लोहगावमधील बालाजी टेलर्स येथे जाऊन आपणच रजत कुमार मिश्रा असल्याचे सांगत ते ओळखपत्र दाखवून हवाई दलाच्या जवानाचा गणवेश शिवण्यास दिला. दरम्यान, त्या टेलरकडे हवाई दलातील एक जवान आला असता, टेलरने अंबुरेने पाठविलेले ओळखपत्र त्याला दाखवले. ओळखपत्र पाहून संबंधित जवानाला संशय आला. चौकशी केल्यानंतर रजत कुमार मिश्रा यांचा २०२२ मध्ये अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर लोहगाव पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर; टॉमटॉम संस्थेचा अहवाल जाहीर

पोलिसांनी अंबुरेला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अंबुरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने हवाई दलाचा गणवेश का परिधान करण्याचा प्रयत्न केला, तसेच बनावट ओळखपत्र कसे तयार केले, याचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘फटाका’ सायलेन्सरवाल्यांनो सावधान! पुणे पोलिसांचा धडाका, तीन दिवसांत तब्बल…

Web Title: Lohgaon police have arrested a person who works at a salon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
1

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
2

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
4

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.