शिरवळ गुटखा प्रकरणी मुख्य सूत्रधार निलेश ललवाणीला चार दिवसांची पोलीस कोठडी
लोणी काळभोर : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शुभम बानु पालखे (वय २२, रा. दत्तमंदिर जवळ, १५ नंबर, जुना कॅमल शेजारी, हडपसर, पुणे), मयुर विलास बोरकर (वय २५, रा. सर्वे नंबर ५. वेताळबाबा वसाहत, ग्लायडींग सेंटर जवळ, हडपसर, पुणे) व अमन महंमद रफिक कोतवाल वय २७, रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रदीप क्षीरसागर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार प्रदीप क्षीरसागर हे शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना माळी मळा परिसरात तिघेजण गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडील एका काळया रंगाच्या कॅरीबॅगीत १९ हजार रुपयांचा ९३० ग्रॅम वजन असलेला गांजा मिळाला. याप्रकरणी आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा २० व भारतीय न्याय संहिता कलम 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.