Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून पकडले

थेऊर परिसरात पार्क केलेल्या एका टेम्पोतून तब्बल ४९५ किलो तांब्याच्या तारा चोरणार्‍या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. या तारांची बाजारात ३ लाख एवढी किंमत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2025 | 12:30 AM
तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून पकडले

तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून पकडले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : थेऊर परिसरात पार्क केलेल्या एका टेम्पोतून तब्बल ४९५ किलो तांब्याच्या तारा चोरणार्‍या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. या तारांची बाजारात ३ लाख एवढी किंमत आहे. व्यापाऱ्याने पोलिसांचे आभार मानले असून, या भागातील वाढत्या चोऱ्यांसाठी बंदोबस्त वाढविण्याबाबत नागरिकांनी पोलिसांना विनंती केली आहे.

सुरज शाम जाधव (वय १९), यश अजित सावंत (वय २१), महेश बसवराज पुजारी (वय २२, रा. सर्व. चव्हाणवस्ती, थेऊर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समाधान हिराजी डोंगरे (रा. थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. ६ जून रोजी रात्री ११ वाजता थेऊर भागात ही घटना घडली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

डोंगरे यांनी त्यांचा टेम्पो थेऊर गावातील जय मल्हार हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत उभा केला होता. टेम्पोत जुन्या आणि जळालेल्या तांब्याच्या तारांचे एकूण ५५ पोते भरलेले होते. परंतु, रात्रीत अज्ञात चोरट्यांनी हे बंडल चोरून नेले. दुसऱ्या दिवशी (दि. ७ जून) सकाळी पाहीले असता चोरीला गेल्याचे दिसून आले. या पोत्यांमध्ये एकूण ४९५ किलो वजनाच्या आणि अंदाजे ३ लाख १ हजार ९५० रुपयांच्या तांब्याच्या तारांचा समावेश होता. याप्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिली.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके गठीत करण्यात आली. तांत्रिक तपासावरून अंमलदार प्रदीप गाडे, राहुल कर्डीले यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानूसार तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Loni kalbhor police have arrested three people for stealing copper wires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास
1

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास

सरकारच्या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, नाहीतर…; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

सरकारच्या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, नाहीतर…; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण
3

Ulhasnagar Crime : केस कापले अन् रस्त्यावरुन..; धार्मिक कारणावरून उल्हासनगरमध्ये तीन महिलांना अर्धनग्न करून मारहाण

व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारचा मोठा निर्णय
4

व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.