Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

Surat Love Jihad Case : आपलं बनावटी नाव सांगून रहिमने पिडितेसोबत जवळीक साधू पाहिली. धार्मिक विधींमध्येही सामील होत त्याने महिलेचा विश्वास जिकंला आणि मग तिचे शारीरिक शोषण केले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 01:23 PM
सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • बनावट ओळख वापरून विश्वास संपादन केल्याचा महिलेचा गंभीर आरोप समोर आला आहे.
  • धार्मिक विधींमध्ये सहभाग घेत आरोपीने जवळीक वाढवल्याचा दावा करण्यात आला.
  • लग्नाचा विषय निघाल्यानंतर प्रकरणात धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती आहे.
देशात लव्ह जिहादचे प्रकरण वाढत असतानाच सुरतमधून पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. महिला वकीलाने आरोप केला आहे की रहिम शेख नावाच्या व्यक्तीने आपली खरी ओळख लपवत रोहन’ हे खोटं नाव सांगत तिच्याशी जवळीक साधली. हिंदू धर्माप्रती त्याला निस्सीम भक्ती आहे असं दाखवत त्याने महिला वकीलाचा विश्वास जिंकला आणि नंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. पिडित महिलेचा आरोप आहे की, विश्वासाच्या जोरावर त्याने तिचे शारीरिक शोषण केले. आरोपीचा खरा चेहरा तेव्हा उघड झाला जेव्हा महिलेने लग्नाचा विषय त्याच्यासमोर काढला.

Mumbai Crime: गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी मुलानेच आईचे लाखोंचे दागिने चोरले; मुंबईत खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रहीम शेख व्यावसायाने वकील असून २०१८ पासून त्याची आणि पिडित महिलेची ओळख आहे. त्याने आपले नाव ‘रोहन’ सांगत पिडित महिलेसोबत संबंध वाढवले आणि तिचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला दोघांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण झाले, जे कालांतराने वैयक्तिक नात्यात बदलले. इतकंच काय तर एक वकिल कार्यालय ओपन करुन त्यांनी एकत्र काम देखील केले. याकाळात त्याने आपले खरे नाव कधीही सांगितले नाही ज्यामुळे पिडित महिलेला कधीही त्यावर शंका आली नाही.

पूजापाठ करुन जिंकला विश्वास

पिडित महिलेने आरोप केला आहे की, रहिमने हिंदू धर्माच्या अनेक विधींमध्ये रुिची दाखवत तिचा विश्वास जिंकला. तो गणपती आणि सत्यनारायणाच्या पूजेत देखील सामील झाला होता. महिलेने हे देखील सांगितले की, त्याने तिच्या भांगेत कुंकु भरून, गळ्यात मंगळसूत्र देखील घातले होते. या सर्व वागणूकीने तिला विश्वास दिला की, त्यांच नाव लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

आरोपीचं आधीच लग्न झालं होतं

महिलेने आरोप केला आहे की, लग्नाचं आमीष दाखवून आरोपीने अनेकदा तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. पण पिडितेने जेव्हा लग्नाचा दबाव टाकला तेव्हा तो पूर्णपणे बदलला आणि त्याने लग्न करण्यास पूर्णपणे नकार दिला. यानंतर जेव्हा महिलेने त्याच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की, आरोपीचं आधीच एका महिलेसोबत निकाह झाला आहे. त्याचं लग्न तिच्यासाठी एक धक्कादायक बाब होती ज्यानंतर आपल्यासोबत झालेल्या फसवेगिरीची तिला कल्पना आली. तिने जेव्हा त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिला मारहाण करत शिवीगाळ देखील केली.

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यानंतर आता रहीम रझाक उर्फ ​​रहीम शेख याच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण लव्ह जिहादचं प्रकरण वाटतं असलं तरी पोलिस याला आरोप मानत तथ्यांच्या आधारे प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

Web Title: Love jihad case rahim sheikh posed as rohan to trap woman lawyer crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • crime news
  • Love Jihad
  • Love Jihad Case
  • Surat

संबंधित बातम्या

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
1

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता
2

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार
3

कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी
4

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.